शहरं
Join us  
Trending Stories
1
नरेंद्र मोदींनी 'हा' जावईशोध कुठून लावला?; शरद पवारांचा पंतप्रधानांना टोला
2
‘मोदी, भाजपा २७२ किंवा ३०० पार का म्हणत नाही? ४०० पार म्हणजे…’ संभाजीराजेंनी सांगितला संभाव्य धोका
3
अमित शाहांच्या बनावट व्हिडिओ प्रकरणी पोलीस ॲक्शन मोडवर, 3 बड्या नेत्यांना पाठवली नोटीस 
4
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीची तेजीसह सुरुवात; BPCL मध्ये तेजी, Kotal Bank घसरला
5
भेटायला गेले अन् पक्षप्रवेश करून घेतला; सकाळी शिंदे गटात, संध्याकाळी ठाकरे गटात
6
"...तर स्टील व्यवसायाच्या विक्रीचा विचार करू," भारतात २० अब्ज डॉलर्सची गुंतवणूक करणार Vedanta Group
7
दोन दिवसांत दाेनदा प्रवासी लटकले; सीएसएमटी ते वडाळ्यापर्यंत वाहतूक कोलमडली
8
कूलर, पंखा, एसीमुळे किती वाढते विजेचे बिल?
9
आजचे राशीभविष्य - २ मे २०२४; व्यापारासाठी दिवस उत्तम, आर्थिक बाबी मार्गी लागतील
10
अमित शाहांच्या मॉर्फ्ड व्हिडीओ प्रकरणी X कडून मोठी कारवाई, झारखंड काँग्रेसचं अकाऊंट केलं बंद
11
स्ट्रोकनंतर पहिल्यांदाच समोर आले Zerodha चे फाऊंडर Nithin Kamath; हेल्थ बद्दल दिली 'ही' माहिती
12
२८-१५-५ महायुतीचा फॉर्म्युला; नाशिक, ठाणे शिंदेसेनेला, पालघर भाजपकडे
13
किंमत वाढूनही आपण खरेदी केले टनाने सोने; भारतीयांनी तीन महिन्यांत घेतले १३६.६ टन सोने
14
जीएसटीने भरली सरकारची तिजोरी; एप्रिलमध्ये २.१० लाख कोटींची वाढ
15
अमेरिकेपेक्षा भारतातच ‘एआय’चा वापर अधिक; तंत्रज्ञान स्वीकारण्यात देश सर्वात आघाडीवर
16
पहिल्या दोन टप्प्यांतील मतदानाची अंतिम टक्केवारी जाहीर; ३ टक्क्यांची वाढ
17
राज ठाकरे सभा घेऊन कोणाच्या वरातीत नाचणार? सभेसाठी मनसेच्या अर्जावर उद्धवसेनेची टीका
18
मुंबईत षटकार मारणार, राज्यात १५ जागा जिंकणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विश्वास
19
लॉकअपमधल्या चादरीच्या पट्टीने गळफास घेत बिश्नोई गँगच्या आरोपीची आत्महत्या
20
देशाच्या विकासात काँग्रेस अडथळा; ‘फॅमिली फर्स्ट’मुळे भारताचे नुकसान, योगी आदित्यनाथ यांचे टीकास्त्र

गेवराई तालुक्यात चोरांचा धुमाकूळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 03, 2019 12:10 AM

गेवराई तालुक्यात मागील काही दिवसांपासून चोरट्यांनी धुमाकूूळ घातला आहे. तसेच गुन्हेगारीचे प्रमाणही वाढले आहे.

ठळक मुद्देपोलिसांचा वचक संपतोय : खून, दरोड्याचा तपासही अपूर्णच

बीड : गेवराई तालुक्यात मागील काही दिवसांपासून चोरट्यांनी धुमाकूूळ घातला आहे. तसेच गुन्हेगारीचे प्रमाणही वाढले आहे. याला रोखण्यात पोलीस अपयशी ठरत असल्याने त्यांचा वचक संपला की काय, असा प्रश्न उपस्थित होते. पुष्पा शर्मा खून प्रकरणाला एक महिना उलटूनही आरोपींना पकडण्यात आलेले नाही. त्यामुळे गेवराई पोलीस संशयाच्या भोवऱ्यात सापडले आहेत.१ एप्रिल रोजी शहरातील पुष्पा शर्मा या महिलेचा खून करून दरोडेखोरांनी सव्वासात लाख रुपयांचा ऐवज लंपास केला होता. महिला उलटून गेला तरी अद्याप तपास लागलेला नाही. नंतर तालुक्यात वाळू माफियानींही धुमाकूळ घातला आहे. खुद्द जिल्हाधिकाऱ्यांनी कारवाई करून गेवराई पोलिसांचा गलथान कारभार चव्हाट्यावर आणला. या प्रकरणामुळे गेवराई पोलीस वाद्ग्रस्त ठरले असतानाच बुधवारी रात्री गढी येथे घरफोडी झाली. शामराव कुलकर्णी यांचे कुटुंब छतावर झोपलेले होते. खाली सर्वत्र कुलूप होते. चोरट्यांनी कुलूप तोडून घरात प्रवेश करीत कपाट व इतर ठिकाणी ठेवलेले दागिने, रोख रक्कम असा पावणेसात लाखांचा ऐवज घेऊन पोबारा केला. गुरूवारी सकाळी हा प्रकार उघडकीस आल्यानंतर गेवराई पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.पीएसओ, म्हणतात दाखल नाही...गढी येथे कुलकर्णी यांच्या घरी चोरी झाल्याचा प्रकार सकाळीच उघडकीस आला. याप्रकरणाची दुपारी ३ वाजेपर्यंत ठाण्यात नोंद झालेली नव्हती.याबाबत गेवराई ठाण्यातील दूरध्वनीवर संपर्क करून विचारले असता घाणे नामक पीएसओंनी अद्याप दाखल झाले नसल्याचे सांगितले.दुसºयांदा कॉल केल्यावर बावणकर नामक कर्मचाºयाने पोलीस निरीक्षक किंंवा पोउपनि यांच्याकडून माहिती घ्या, असे सांगून हात झटकले. हे प्रकरण दाखल करून घेण्यास उशीर का, असा सवाल उपस्थित होत आहे.बीड शहरातही धाडसी चोरीबीड : रानबा शंकरराव हातागळे यांचे संत नामदेवनगरमध्ये घर आहे. बुधवारी रात्री हातागळे कुटुंबिय घरात झोपलेले असताना पहाटेच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी घरात प्रवेश केला.घरातील ८.५ ग्रॅम वजनाचे सोन्याचे दहा हजार रुपये किंमतीचे मंगळसूत्र, चार ग्रॅम वजनाचे सोन्याचे २२ हजार रुपये किंमतीचे झुंबर, फूल व नगदी चार हजार असा एकूण ३६ हजार रुपयांचा ऐवज लंपास केला.सकाळी घरात चोरी झाल्याचे लक्षात आल्यानंतर रानबा हातागळे यांनी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली. त्यानुसार अज्ञातांविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला. स.पो.नि. गिरी पुढील तपास करत आहेत.

टॅग्स :BeedबीडBeed policeबीड पोलीसtheftचोरी