Thieves floor to the cows on the fort | चोरांची मजल गडावरील गायीपर्यंत

चोरांची मजल गडावरील गायीपर्यंत

लोकमत न्यूज नेटवर्क
शिरूर : महाराष्ट्राची धाकटी पंढरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या श्री क्षेत्र नारायणगडावरती चोरट्यांची मजल गेली आहे. चोरट्यांनी रात्री अंधाराचा फायदा घेत पाच गायी चोरून नेल्याची घटना शनिवारी उघडकीस आली आहे.
सध्या दुष्काळामुळे चोºया करणाऱ्यांचे प्रमाण वाढू लागले आहे. चोरांनी जवळपास एक महिन्यामध्ये तीन ते चार वेळेस गडावरील गायी चोरुन नेण्याचा प्रयत्न केला आहे. गडावरील नागरिकांनी वेळीच सतर्कता दाखवल्यामुळे त्यांचा डाव उधळण्यात आला होता.
चोरट्यांनी गायी चोरुन नेल्यानंतर परत तीन ते चार वेळेस गडावर आले. मात्र, गडावरील नागरिकांनी सावध होऊन ते चोरांच्या दिशेने गेल्यामुळे त्यांनी पळ काढला. त्यामुळे त्यादिवशी गाई चोरीला गेल्या नाही. पण हे किती दिवस चालणार त्या अनुषंगाने गडाच्या वतीने शिरूर पोलीस ठाणे व बीड येथे अर्ज दिलेला आहे. शिरूर पोलीस ठाण्याची गाडी दोन दिवस गडावरती येऊन गेली. मात्र नंतर एकही कर्मचारी फिरकलेला दिसून आला नाही.

Web Title: Thieves floor to the cows on the fort

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.