चोरांचे वाढते धाडस, भर दुपारी घरफोडी; ९ तोळे सोन्यासह १७ हजारांची रोकड लंपास

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 23, 2022 16:35 IST2022-11-23T16:34:43+5:302022-11-23T16:35:00+5:30

आष्टी तालुक्यातील शेकापूर येथील घटना

Thieves are becoming bolder, breaking into houses in the afternoon; 17 thousand in cash with 9 tolas of gold | चोरांचे वाढते धाडस, भर दुपारी घरफोडी; ९ तोळे सोन्यासह १७ हजारांची रोकड लंपास

चोरांचे वाढते धाडस, भर दुपारी घरफोडी; ९ तोळे सोन्यासह १७ हजारांची रोकड लंपास

कडा ( बीड) : कुटुंबासह शेतात गेलेल्या शेतकऱ्याचे घर भरदुपारी चोरट्यांनी फोडल्याची घटना मंगळवारी दुपारी शेकापूर येथे घडली. चोरट्यांनी घरी कोणी नसल्याची संधी साधत ९ तोळे सोन्याच्या दागिन्यांसह १७ हजार रोख रक्कम चोरून पाबोरा केला. 

आष्टी तालुक्यातील शेकापूर येथील भाऊसाहेब किसन फुंदे हे शेतकरी आहेत. मंगळवारी सकाळी ते कुटुंबासह शेतात गेले होते. दुपारी घरी कोणी नसल्याची संधी साधत चोरट्यांनी कुलूप तोडत घरात प्रवेश केला. घरातील लोंखडी पेटीतील ९ तोळे सोन्याच्या दागिन्यांसह १७ हजार रूपये रोख रक्कम असा एकूण ५ लाख ९२ हजारांचा ऐवज चोरट्यांनी लंपास घेतला. या प्रकरणी आष्टी पोलिस ठाण्यात भाऊसाहेब किसन फुंदे याच्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्या विरोधात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. याप्रकरणी पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक प्रमोद काळे करीत आहेत.

Web Title: Thieves are becoming bolder, breaking into houses in the afternoon; 17 thousand in cash with 9 tolas of gold