शहरं
Join us  
Trending Stories
1
सामंतांनी मदत केली तर... रत्नागिरी-सिंधुदूर्गात राणे - ठाकरे संघर्षाचा सामना; बालेकिल्ला कोणाचा याचाही फैसला
2
निवडणूक ‘यांची’, प्रतिष्ठा पणाला ‘त्यांची’; मुलगी, मुलगा, बहीण, सुनेसाठी करावी लागतेय अपार मेहनत
3
राज्यावर पाणीटंचाईचे संकट अधिक चिंताजनक; पाणीसाठा २८ टक्क्यांवर; २,३४४ गावांत २,९५२ टँकर्स सुरू
4
अपोफिस लघुग्रहामुळे ‘दुसरे लोणार’ नाही; दा. कृ. सोमण यांची माहिती
5
राधाकृष्ण विखे आणि मल्लिकार्जुन खर्गेंमध्ये झाली गुप्त बैठक, प्रकाश आंबेडकरांचा सनसनाटी दावा
6
पूंछमध्ये लष्करी वाहनांवर दहशतवाद्यांचा हल्ला; हवाई दलाचा जवान शहीद, ४ जखमी
7
आजचे राशीभविष्य - ५ मे २०२४, कुटुंबात सुखशांतीचे वातावरण असेल, धनप्राप्ती संभवते
8
कांदा निर्यातबंदी अखेर घेतली मागे, ६४ रुपये प्रतिकिलोने निर्यातीस मान्यता; प्रतिक्विंटल ५०० रुपयांनी वाढले दर
9
सेक्स स्कॅण्डल प्रकरणी एच. डी. रेवण्णा अटकेत; एसआयटीने घेतले ताब्यात
10
सांगली, सातारचे ‘ते’ संजय पाटील ‘नॉट रिचेबल’; एकाच व्हेंडरकडून प्रतिज्ञापत्र अन्...
11
फाेडाफाेडीच्या राजकारणात काेणाची हाेणार सरशी? चार नावे जाहीर करून काँग्रेसने टाकला डाव, भाजपसह ‘आप’चे वाढले टेन्शन 
12
रायबरेलीत राहुल गांधी मोठ्या फरकाने निवडणूक हरतील : अमित शाह यांचा दावा
13
पंतप्रधान मोदी हे ‘शहेनशहा’... काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांची टीका
14
पाकला ‘शहजादा’ हवा पंतप्रधानपदी; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घणाघाती टीका
15
माझ्याकडे पैसे नाहीत, मी निवडणूक लढवू शकत नाही; नाराजी व्यक्त करत काॅंग्रेसच्या उमेदवाराने तिकीट केले परत
16
"आई आणि बायकोच्या राड्यात...", कुशल बद्रिकेची 'ती' पोस्ट चर्चेत
17
इंटरनेटवरून पसरणारा कट्टरतावाद धोकादायक; इंटरपोल परिषदेत भारताची ठाम भूमिका
18
पोलिसांनी मागवले राजभवनचे सीसीटीव्ही फुटेज, चाैकशी सुरू; राज्यपालांवरील लैंगिक शोषणाचे आरोप
19
गैरवापर रोखण्यासाठी ‘४९८ अ’ कायदा बदला; सर्वोच्च न्यायालयाकडून केंद्र सरकारला महत्त्वाची शिफारस 
20
भाजपकडूनच राहुल गांधी यांचा जप! काँग्रेस नेत्या सुप्रिया श्रीनेत यांची टीका

...तर नरभक्षक बिबट्यास ठार मारण्याची परवानगी घेऊ - धनंजय मुंडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 28, 2020 3:18 PM

Leopard Attack, Dhananjay Munde : नरभक्षक बिबट्याला पकडण्यासाठी राज्यातील सर्व टीम आष्टीत पाचारण करणार

ठळक मुद्दे गर्जॅ, भापकर कुटुंबीयांचे ग्रामस्थांसमोर स्विकारले पालकत्व 

कडा ( बीड ) : सुर्डी, किन्ही येथे दोघांच्या नरडीचा घोट घेतलेला बिबट्या अद्यापही हाती लागत नाही. बिबट्याला जेरबंद करण्यासाठी औरंगाबाद, अमरावती, पुणे, जुन्नर, नगर, बीड येथील टीम तळ ठोकून आहेत. आता राज्यातील सर्व टीम नरभक्षक बिबट्याला पकडण्यासाठी आष्टीत पाचारण करणार आहे. त्यातही यश मिळाले नाही तर वन्यजीव विभागाची परवानगी घेऊन बिबट्याला शुटरच्या माध्यमातून ठार मारण्याची परवानगी घेणार असल्याचे पालकमंत्री ना.धनजंय मुंडे स्पष्ट केले. 

आष्टी तालुक्यातील सुर्डी व किन्ही येथील बिबट्याने केलेल्या हल्ल्यात दोघाचा जिव गेला. त्या कुटुंबाचे  सांत्वन करण्यासाठी पालकमंत्री धनंजय मुंडे शनिवारी आष्टी तालुक्यात आले असता ते  पत्रकारांशी बोलत होते. आष्टी तालुक्यात नरभक्षक बिबट्याची दहशत निर्माण झाली आहे. मी यावर बारकाईने लक्ष ठेऊन आहे. बिबट्याचा बंदोबस्त करण्यासाठी औरंगाबाद, नागपुर येथील अधिकाऱ्यांशी बोलणे झाले आहे. या टीमला यश आले नाही तर रात्रीतुन राज्यातील सर्व टीमला आष्टीत पाचारण करण्यात येईल. शेवटी वन्यजीव विभागाची परवानगी घेऊन शुटरच्या माध्यमातून बिबट्याला ठार करण्यात येईल. याबाबतच्या परवानगीसाठी वनमंत्री संजय राठोड यांच्याशी माझे बोलणे झाले आहे, अशी माहिती पालकमंत्री मुंडे यांनी दिली.  तसेच ग्रामस्थांनी घाबरून जाऊ नये असे आवाहनही त्यांनी केले. 

गर्जे, भापकर कुटुंबाचे पालकत्व स्वीकारले यावेळी त्यांनी सुर्डी येथील शेतकरी नागनाथ गर्जॅ व स्वराज भापकर याच्या कुटुंबियांचे पालकत्व सर्व ग्रामस्थांसमोर स्विकारले. स्वराज भापकर याच्या कुटुंबालासुद्धा शासनाच्या माध्यमातून पाच लाख रुपयांचा धनादेश व दहा लाखांची एफडीची मदत देण्यात येईल असेही पालकमंत्री मुंडे यांनी सांगितले. यावेळी आमदार बाळासाहेब आजबे, माजी आमदार साहेबराव दरेकर, बजरंग सोनवणे, रामकृष्ण बांगर, सतिश शिंदे, आदि उपस्थित होते.

टॅग्स :Dhananjay Mundeधनंजय मुंडेBeedबीडforestजंगलleopardबिबट्या