माजलगावात एकाच रात्री तीन दुकांनात चोरी; एका रूग्णालयातही चोरीचा प्रयत्न
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 5, 2022 17:18 IST2022-11-05T17:18:27+5:302022-11-05T17:18:49+5:30
संभाजी चौकात असलेल्या मोरे हाँस्पीटलमध्ये चोरट्यांनी अडीच वाजण्याच्या सुमारास चोरीचा प्रयत्न

माजलगावात एकाच रात्री तीन दुकांनात चोरी; एका रूग्णालयातही चोरीचा प्रयत्न
माजलगाव (बीड): शहरातील वर्दळीचा असणाऱ्या जुना मोंढा भागातील एका हार्डवेअर व दोन मशीनरीच्या दुकानचे शटरचे कोंडे तोडून अज्ञात चोरट्यांनी काउंटरमध्ये असणारी तीन दुकानातील एकूण 95 हजाराची रक्कम लांबवली.तर एका हाँस्पीटलमध्ये आरडाओरडा झाल्याने चोरीचा प्रयत्न असफल झाला. ही घटना आज पहाटे घडली.
पवन ओमप्रकाश मुंदडा यांचे मुंदडा मशिनरी,प्रकाश शिवराज तातेड यांचे महावीर मशिनरी व सत्तेप्रेम गोरख आगे यांचे बजरंग हार्डवेअर नावाचे दुकान जुना मोंढा भागात आहे.अज्ञात चोरट्यांनी शनिवारी पहाटे 3 ते 4 वाजण्याच्या सुमारास दुकानच्या शटरचे कोंडे तोडून प्रवेश केला.यावेळी अज्ञात चोरट्यांनी मुंदडा मशिनरी दुकानातून मधुन 53 हजार रुपये लंपास केले.व दुकानातील सीसीटीव्ही चा डीव्हीआर तोडून नुकसान केले.तर महावीर मशिनरीच्या ड्राप फोडून आतील 20 हजार रुपये काढून घेतले.त्याचप्रमाणे बजरंग हार्डवेअर फोडून गल्ल्यातील 19 हजार रुपये काढून घेतले.असा तिने दुकानातील एकूण 95 हजार रुपयाची रोकड चोरट्यांनी लंपास केली.
याच दरम्यान संभाजी चौकात असलेल्या मोरे हाँस्पीटलमध्ये चोरट्यांनी अडीच वाजण्याच्या सुमारास चोरीच्या उद्देशाने आतमध्ये प्रवेश केला. यावेळी येथे झोपलेल्या नागरिकांना जाग येतात त्यांनी आरडाओरड केली त्यानंतर चोरट्याने येथून पोबारा केला. या ठिकाणी त्यांच्या हाती काहीच लागले नाही. दरम्यान अज्ञात चोरट्या विरोधात शहर पोलिसात पवन ओमप्रकाश मुंदडा यांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक धनंजय फराटे हे करत आहेत.