अंबाजोगाईत नऊ दुकाने फोडली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 31, 2019 01:14 IST2019-07-31T01:14:21+5:302019-07-31T01:14:38+5:30

शहरातील बस आगारासमोर मुख्य रस्त्यालगत रविवारी मध्यरात्री नऊ दुकानांचे पत्रे उचकटून चोरीची घटना घडली

Theft in 9 shops in Ambajogai | अंबाजोगाईत नऊ दुकाने फोडली

अंबाजोगाईत नऊ दुकाने फोडली

लोकमत न्यूज नेटवर्क
अंबाजोगाई : शहरातील बस आगारासमोर मुख्य रस्त्यालगत रविवारी मध्यरात्री नऊ दुकानांचे पत्रे उचकटून चोरीची घटना घडली. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला.
शहरातील साठे चौक ते डॉ. आंबेडकर चौक परिसरातील बस आगारासमोरच मुख्य रस्त्यालगत पाण्याचे शेड ठोकून शॉपिंग कॉम्प्लेक्स तयार करण्यात आलेले आहेत. या दुकानाची पत्रे उचकटून चोरी करणे चोरांना सहज शक्य झाले. रविवारी मध्य रात्री साठे चौकातील ९ दुकानांत चोरांनी दुकानाच्या मागचा पत्रा उचकटून प्रवेश केला साहित्य, रोख रक्कम लंपास केली. चोरट्यांनी किती रक्कम लांबविली. याची माहिती समजली नाही. पोलिसांची गस्त असते, तरीही चोरीची घटना कशी घडली, असा प्रश्न निर्माण होत आहे.

Web Title: Theft in 9 shops in Ambajogai