तरुण प्लंबर शनिवारपासून होता गायब, रविवारी सायंकाळी आढळला मृतदेह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 3, 2023 12:23 IST2023-04-03T12:22:42+5:302023-04-03T12:23:04+5:30
२५ वर्षीय तरूणाने गळफास घेऊन संपवले जीवन; आष्टी तालुक्यातील कडा येथील घटना

तरुण प्लंबर शनिवारपासून होता गायब, रविवारी सायंकाळी आढळला मृतदेह
- नितीन कांबळे
कडा - प्लंबर म्हणून काम करत असलेल्या एका २५ वर्षीय तरूणाने माळरानावर असलेल्या बाभळीच्या झाडाला पॅन्टच्या सहाय्याने गळफास घेऊन जीवन संपविल्याची घटना कडा येथे रविवारी सायंकाळच्या दरम्यान घडली. आकाश बापू भाकरे असे मृत तरूणाचे नाव आहे.
आष्टी तालुक्यातील कडा येथील आकाश बापू भाकरे हा लहानपणापासून मामाकडे राहत असे. तो प्लंबीगचे काम करत होता. शनिवारी रात्री आकाश घरी आला नव्हता. दरम्यान, रविवारी सायंकाळी शहरापासून जवळ असलेल्या माळरानावर बाभळीच्या झाडाला त्याचा मृतदेह लटकताना आढळून आला. आत्महत्येचे कारण अद्याप स्पष्ट झाले नाही. या प्रकरणी अंभोरा पोलिस ठाण्यात आकस्मिक मूत्युची नोंद करण्यात आली असून पुढील तपास सुरु आहे.