घरफोडीतील सराईत आरोपीच्या आवळल्या मुसक्या
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 11, 2023 16:21 IST2023-03-11T16:19:21+5:302023-03-11T16:21:28+5:30
अट्टल दरोडेखोर आटल्याचा साथीदार पोलिसांच्या जाळ्यात

घरफोडीतील सराईत आरोपीच्या आवळल्या मुसक्या
- नितीन कांबळे
कडा ( बीड) : घरफोडी प्रकरणात फरार आरोपीच्या आष्टी पोलिसांनी शुक्रवारी सायंकाळी सहाच्या दरम्यान मुसक्या आवळल्या. सोन्या उर्फ लाल्या ईश्वर भोसले असे आरोपीचे नाव आहे.
अहमदनगर जिल्ह्यातील बेलगाव येथील रहिवाशी असलेला सोन्या उर्फ लाल्या ईश्वर भोसले (२८) हा मागील सहा महिन्यांपासून आष्टी पोलिसांना घरफोडी प्रकरणात हवा होता. पण तो पोलिसांना सारखा गुंगारा देत असल्याने मिळून येत नव्हता. दरम्यान, बीड-नगर राष्ट्रीय महामार्गावरील चिंचपुर येथे जामखेड शहराकडे जाण्यासाठी सोन्या उभा असल्याची गोपनीय माहिती शुक्रवारी पोलिसांनी मिळाली. आष्टी पोलिसांनी पाठलाग करून त्याच्या सायंकाळी सहा वाजेच्या दरम्यान मुसक्या आवळल्या. अट्टल दरोडेखोर आटल्याचा तो सोबती आहे. महागड्या दुचाकी चोरण्यात तो सराईत आहे.
ही कारवाई आष्टीचे उपअधीक्षक अभिजीत धाराशिवकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक हेमंत कदम, पोलिस उपनिरीक्षक अजित चाटे,प्रमोद काळे, पोलिस अंमलदार प्रवीण क्षीरसागर विकास जाधव,आकाश अडागळे, शिवप्रकाश तवले,सचिन कोळेकर , श्रीगणेश राऊत यांनी केली. न्यायालयाने १३ मार्च पर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.