टायर फुटल्याने कंटेनर समोरच्या वाहनावर धडकला, चालकाचा जागीच मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 1, 2023 19:21 IST2023-09-01T19:20:52+5:302023-09-01T19:21:01+5:30
आष्टी तालुक्यातील चालकाचा नगर येथे अपघाती मूत्यू

टायर फुटल्याने कंटेनर समोरच्या वाहनावर धडकला, चालकाचा जागीच मृत्यू
- नितीन कांबळे
कडा- छत्रपती संभाजीनगर येथून मुंबईकडे कंटेनर घेऊन निघालेल्या पाटण सांगवी येथील चालकाचा अचानक कंटेनरचे टायर फुटल्याने समोरासमोर झालेल्या अपघातात जागीच मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी पहाटेच्या दरम्यान घडली. आजिनाथ भिमराव वनवे ( ४२, रा.पाटण सांगवी ता.आष्टी) असे मृत तरूण चालकाचे नाव आहे.
आष्टी तालुक्यातील पाटण सांगवी येथील आजिनाथ वनवे हे गेली अनेक वर्षापासून खाजगी वाहनावर ड्रायव्हर म्हणून काम करतात. नेहमीप्रमाणे ते छत्रपती संभाजीनगर येथून मुंबईकडे कंटेनर घेऊन निघाले होते. आज पहाटेच्या दरम्यान घोडेगाव येथे आले असता अचानक कंटेनरचे पुढील टायर फुटले. यामुळे ताबा सुटल्याने कंटेनर समोरील वाहनाला धडक दिली. यात कंटेनर चालक आजिनाथ वनवे याचा जागीच मृत्यू झाला. त्यांच्या पश्चात आई, पत्नी, एक मुलगा, एक मुलगी असा परिवार आहे.