'काळ आला होता पण...'पुलावरून खाली कोसळला पिकअप; पोलिसांच्या सतर्कतेने चालक सुखरूप

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 30, 2022 13:04 IST2022-11-30T13:02:42+5:302022-11-30T13:04:25+5:30

पैठण बारामती रोडवर कडानजीक पिकअप गेला पुलाच्या खाली

'The time had come but...'Pickup fell down from the bridge; The driver is safe due to police alert | 'काळ आला होता पण...'पुलावरून खाली कोसळला पिकअप; पोलिसांच्या सतर्कतेने चालक सुखरूप

'काळ आला होता पण...'पुलावरून खाली कोसळला पिकअप; पोलिसांच्या सतर्कतेने चालक सुखरूप

- नितीन कांबळे 
कडा ( बीड) -
 वेळ आज पहाटे अडीज वाजेची शेवगाववरून कांदा भरून एक पिकअप कडा येथील येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत येत होता. पैठण बारामती रोडवरील कडा नजीक अचानक चालकाचा ताबा सुटल्याने वाहन पुलावरून खाली कोसळले. याच वेळी पेट्रोलिंग करत असलेल्या कडा पोलिस चौकीतील कर्मचाऱ्यांनी तत्काळ धाव घेत चालकाल बाहेर काढले. यामुळे त्याचे प्राण वाचले आहेत. हा प्रसंग पाहून काळ आला होता पण वेळ आली नव्हती याची प्रचीती आली. 

शेवगाव तालुक्यातील पिंगेवाडी येथील सोमनाथ कचरू जाधव हा मंगळवारी रात्री पिकअप ( क्रमांक एम.एच २०,डी.ई.६८९९) मध्ये कांदा गोण्या घेऊन कडा येथील कृषी उत्पन्न बाजार समितीकडे पैठण बारामती रोडने येत होता. कडा नजीक येताच चालकाला झोप लागल्याने अनियंत्रित पिकअप पुलाच्या खाली गेले. यात चालक वाहनात अडकून पडला. 

याचवेळी नाईट राऊड पेट्रोलिंग करत असलेले कडा पोलिस चौकीचे हवालदार बाबासाहेब राख, वाहन चालक प्रदिप घोडके यांना हे दृश्य दिसले. त्यांनी लागलीच अपघातग्रस्त वाहनाकडे धाव घेतली. प्रयत्न पूर्वक पोलिसांनी चालकाला सुखरूप बाहेर काढले. पोलिसांच्या सतर्कतेने जाधवचे प्राण वाचले. भल्या पहाटे पोलिस देवाच्या रूपात पुढे उभा ठाकल्याने मला जिवदान मिळाल्याची प्रतिक्रिया चालक सोमनाथ जाधव याने दिली.

Web Title: 'The time had come but...'Pickup fell down from the bridge; The driver is safe due to police alert