बीड पोलिसांचा रोल संपला, मस्साजोगचे तिनही गुन्हे सीआयडीकडे; आता मोर्चा कोठे निघणार?
By सोमनाथ खताळ | Updated: December 25, 2024 16:02 IST2024-12-25T16:01:01+5:302024-12-25T16:02:33+5:30
या मोर्चात मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्यासह खासदार, आमदार, इतर लोकप्रतिनिधी, सर्वधर्मातील लोक, सर्व पक्षातील नेते, कार्यकर्ते आदी सहभागी होणार आहेत.

बीड पोलिसांचा रोल संपला, मस्साजोगचे तिनही गुन्हे सीआयडीकडे; आता मोर्चा कोठे निघणार?
बीड : केज तालुक्यातील सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरण, खंडणी आणि सुरक्षा रक्षकाला मारहाण हे तिनही गुन्हे आता सीआयडीकडे वर्ग करण्यात आले आहेत. त्यामुळे या प्रकरणातून बीडपोलिसांचा रोल संपला आहे. दरम्यान, त्या आधीच जिल्हाभरातील सर्वांनी एकत्रित येऊन २८ डिसेंबर रोजी पोलिस अधीक्षक कार्यालयावर मोर्चा काढण्याचे निश्चीत केले होते. परंतू आता बीड पोलिसांच्या हाती काहीच राहिले नाही. मोर्चा तर निघणारच आहे, परंतू तो पोलिस अधीक्षक कार्यालयावर जाणार की जिल्हाधिकारी कार्यालयावर, याबाबत चर्चा सुरू झाल्या आहेत.
मोर्चा जर पोलिस अधीक्षक कार्यालयावर नेला तर पोलिस अधीक्षक आणि वरिष्ठ अधिकारी यांच्याकडून आता आमच्याकडे तपास राहिला नाही, असे उत्तर देतील. परंतू हाच मोर्चा जर जिल्हाधिकारी कार्यालयावर नेला तर जिल्हाधिकारी हे आपल्या अधिकारात सीआयडीचे वरिष्ठ अधिकारी, मुख्यमंत्री कार्यालय आदींना बोलून यावर मार्ग काढू शकतात, असे तज्ज्ञांचे मत आहे. त्यामुळे मोर्चाचे ठिकाण बदलणार की तेच राहणार? २८ डिसेंबरलाच समजणार आहे.
दरम्यान, या मोर्चात मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्यासह खासदार, आमदार, इतर लोकप्रतिनिधी, सर्वधर्मातील लोक, सर्व पक्षातील नेते, कार्यकर्ते आदी सहभागी होणार आहेत. दोन दिवसांपूर्वीच या मोर्चाचे नियोजन बीडमध्ये करण्यात आले होते.