पतीनेच करायला लावला पत्नीवर अत्याचार; ती मदत मागत असताना हा दार लावून निघून गेला
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 5, 2022 16:30 IST2022-11-05T16:30:35+5:302022-11-05T16:30:54+5:30
पतीसह नराधमावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे

पतीनेच करायला लावला पत्नीवर अत्याचार; ती मदत मागत असताना हा दार लावून निघून गेला
माजलगाव : स्वतःच्या पत्नीसोबत एका व्यक्तीला तिच्या इच्छेला न जुमानता शारीरिक संबंध करायला लावल्याची घटना २६ जुलै २०२२ रोजी घडली होती. दरम्यान, पीडित पत्नीच्या फिर्यादीवरून २ नोव्हेंबर रोजी ग्रामीण पोलीस ठाण्यात पतीसह त्या नराधम व्यक्तीविरुद्ध अत्याचाराचा गुन्हा दाखल झाला आहे.
२६ जुलै २०२२ रोजी माजलगाव तालुक्यातील एका ठिकाणी एका विवाहित महिलेच्या घरात बाशेद इनामदार नावाची व्यक्ती घुसली. त्या महिलेसोबत शरीरसंबंध प्रस्थापित करण्याची मागणी करू लागला. हा सर्व प्रकार महिलेच्या पतीसमोर घडत होता. दरम्यान, महिला आरडाओरड करू लागली. त्यावेळी बाशेद इनामदार याने आरडाओरड केलीस तर तुझ्या मुलांना जिवंत मारून टाकेन, अशी धमकी दिली व महिलेवर अत्याचार केला. हा प्रकार अनेक दिवस घडत होता.
हा प्रकार घडत असतानाच्या दरम्यान विवाहितेचा पती हा घरातून निघून जात असे. बाशेद इनामदार हा पीडित महिलेच्या मनाविरुद्ध तिच्यावर राजरोस अत्याचार करत असे. दरम्यान, पीडित महिलेने या अन्यायाविरुद्ध ग्रामीण पोलीस स्टेशन गाठत २ नोव्हेंबर रोजी वाचा फोडली. पीडित महिलेच्या फिर्यादीवरून आरोपी बाशेद इनामदार , पतीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, प्रकरणातील दोन्ही आरोपी फरार आहेत. तपास पोलीस उपनिरीक्षक सुनील बोडखे करत आहेत. घटनास्थळी उपविभागीय अधिकारी धीरजकुमार बच्चू यांनी भेट दिली.