स्टार्टरला हात लागताच विजेचा जोरदार झटका बसला; शेतकऱ्याचा जागीच मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 30, 2024 20:04 IST2024-12-30T20:04:26+5:302024-12-30T20:04:56+5:30

आष्टी तालुक्यातील डोंगरगण येथील घटना

The farmer received a severe electric shock as soon as he touched the starter; he died on the spot. | स्टार्टरला हात लागताच विजेचा जोरदार झटका बसला; शेतकऱ्याचा जागीच मृत्यू

स्टार्टरला हात लागताच विजेचा जोरदार झटका बसला; शेतकऱ्याचा जागीच मृत्यू

- नितीन कांबळे
कडा-
पिकाला पाणी देऊन झाल्यावर विद्युत पंप बंद करण्यासाठी गेले असता स्टार्टरला हात लावताच विद्युत प्रवाहाचा धक्का बसल्याने तरूण शेतकऱ्याचा जागीच मृत्यू झाला. ही घटना आज, सोमवारी सकाळी साडेअकराच्या दरम्यान डोंगरगण येथे घडली. संदीप मुरलीधर कर्डीले ( ४२) असे मृत शेतकर्‍याचे नाव आहे.

आष्टी तालुक्यातील डोंगरगण येथील शेतकरी संदीप मुरलीधर कर्डिले (४२) हे सोमवारी सकाळी साडेअकराच्या दरम्यान स्वत:च्या शेतात पिकाला पाणी देत होते. पाणी देऊन झाल्यावर  विद्युत मोटार बंद करताना स्टार्टरमध्ये विद्युत प्रवाह उतरल्याने त्याचा धक्का बसून संदीप दूर फेकल्या गेले. यातच त्यांचा जागीच मृत्यू झाला. त्यांच्या पश्चात आई, भाऊ, पत्नी, मुलगा, मुलगी असा परिवार आहे. त्यांच्या मृत्यूची वार्ता समजताच गावात हळहळ व्यक्त होत आहे.

Web Title: The farmer received a severe electric shock as soon as he touched the starter; he died on the spot.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.