धक्कादायक! परळीतील लेंडेवाडी शिवारात आढळला परप्रांतीय महिलेचा मृतदेह
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 27, 2023 17:19 IST2023-04-27T17:18:25+5:302023-04-27T17:19:24+5:30
मृतदेहाजवळ एक पर्स सापडली असून त्यात एक मोबाईल आणि ओळखपत्र सापडले आहे

धक्कादायक! परळीतील लेंडेवाडी शिवारात आढळला परप्रांतीय महिलेचा मृतदेह
परळी (बीड): येथील लेंडेवाडी शिवारातील रेल्वेरुळाजवळ आज सकाळी 23 वर्षीय महिलेचा मृतदेह आढळून आला. ओळखपत्रावरून महिला परराज्यातील असल्याचे समजते.
मृत महिलेच्याजवळ एक बॅग आढळून आली आहे. बॅग ( पर्स) मध्ये एक मोबाईल व पॅन कार्ड सापडले आहे. पॅन कार्डवरून त्या महिलेचे नाव हरीनी एटी असे असून वय 23 असल्याची माहिती परळी ग्रामीण पोलिसांनी दिली. ग्रामीण पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक लक्ष्मणराव टोले, पोलीस कॉन्स्टेबल घरत, परतवाड यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. दरम्यान, पर्समध्ये सापडलेल्या मोबाईलवरून महिलेच्या नातेवाईकांचा पोलीस शोध घेत आहेत. महिलेचे मृत्यूचे कारण अद्याप स्पष्ट झाले नसून पोलीस पुढील तपास करत आहेत.