कंटेनर चालकाचा स्टेअरिंगवरील ताबा सुटला अन् दुचाकीवरील दोन मित्रांचा जीव गेला
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 8, 2024 18:26 IST2024-08-08T18:25:21+5:302024-08-08T18:26:01+5:30
अहमदनगर ते मिरजगाव रोडवरील घटना; दुचाकीवरील दोघेजण जागीच ठार

कंटेनर चालकाचा स्टेअरिंगवरील ताबा सुटला अन् दुचाकीवरील दोन मित्रांचा जीव गेला
- नितीन कांबळे
कडा (बीड): चालकाचे स्टेअरिंगवरील नियंत्रण सुटल्याने भरधाव कंटेनरने दुचाकीला जोराची धडक दिली. यात दुचाकीवरील दोघेजणांचा जागीच मृत्यू झाला. हा अपघात अहमदनगर ते मिरजगाव रस्त्यावर गुरूवारी दुपारी झाला. अंभोरा येथील राजेश बबन थोरात ( २८) आणि शेखर नवनाथ मिसाळ अशी मृतांची नावे आहेत.
आष्टी तालुक्यातील अंभोरा येथील राजेश थोरात आणि शेखर मिसाळ हे दोघेजण आज दुपारी दुचाकीवरून ( क्रमांक एम.एच २३, ए.क्यू. ६११४) कामानिमित्त अहमदनगर जिल्ह्यातील घोंगरगावला निघाले होते. याचवेळी अहमदनगर ते मिरजगाव रस्त्यावर भरधाव वेगात असलेल्या कंटेनर चालकाचा स्टेअरिंग वरील ताबा सुटला. कंटेनर थेट दुचाकीला धडकले. यात राजेश आणि शेखर या दोघांचाही जागीच मृत्यू झाला. दोन्ही तरुणांच्या मृत्यूची वार्ता समजताच अंभोरा गावावर दुखांचा डोंगर कोसळला आहे. मृतदेह अहमदनगर येथील जिल्हा रूग्णालयात शवविच्छेदनासाठी ठेवण्यात आले आहेत.