कुक्कडगावात विहिरीत आढळला महिलेचा मृतदेह, पोलिसांकडून ओळख पटविण्याचे काम सुरू
By सोमनाथ खताळ | Updated: April 13, 2023 19:31 IST2023-04-13T19:31:23+5:302023-04-13T19:31:37+5:30
कुक्कडगाव शिवारातील एका विहिरीत महिलेचा मृतदेह आढळल्याचे एका शेतकऱ्याला समजले.

कुक्कडगावात विहिरीत आढळला महिलेचा मृतदेह, पोलिसांकडून ओळख पटविण्याचे काम सुरू
बीड : तालुक्यातील कुक्कडगाव परिसरात एका महिलेचा विहिरीत तरंगताना मृतदेह आढळला. रात्री साडे सात वाजेपर्यंत हा मृतदेह बाहेर काढण्यासाठी पोलिसांचे प्रयत्न सुरू होते. तसेच मृतदेह बाहेर काढल्यावरच ओळख पटेल, असाही दावा पोलिसांनी केला आहे.
कुक्कडगाव शिवारातील एका विहिरीत महिलेचा मृतदेह आढळल्याचे एका शेतकऱ्याला समजले. त्यांनी लगेच ही माहिती पिंपळनेर पोलिसांना दिली. गुरूवारी सायंकाळी सहा वाजता सहायक पोलिस निरीक्षक कैलास भारती व त्यांचे पथक घटनास्थळी पोहचले. रात्रीची वेळ आणि विहिर खोल असल्याने तो मृतदेह बाहेर काढता येत नव्हता. महिलेच्या अंगावर काही खुना दिसत असल्याची चर्चा घटनास्थळी होती. परंतू पोलिसांकडून दुजोरा मिळाला नाही.