शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
3
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
4
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
5
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
6
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
7
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
8
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
9
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
10
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
11
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
12
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
13
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
14
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
15
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
16
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
17
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
18
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
19
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
20
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

बीडमधील धारूर नगरपरिषदेत भाजपाची पिछेहाट, अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा 'दे धक्का'

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 21, 2025 14:50 IST

धारूर नगरपरिषदेच्या निवडणुकीत भाजपाच्या सर्वच्या सर्व उमेदवारांचा पराभव झाला असून अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसची सरशी झली...

राज्यातील नगरपरिषदा आणि नगरपंचायतींचे निकाल आज जाहीर होत आहेत. या निवडणुकीत भाजपा हा सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. दरम्यान, बीड जिल्ह्यातील धारूरमध्ये भाजपला अजित दादांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने 'दे धक्का' दिला आहे. धारूर नगर परिषदेच्या निवडणुकीत भाजपचा पराभव झाला असून अजित पवारांच्याराष्ट्रवादी काँग्रेसची सरशी झली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस गटाचे प्रकाश सोळंके यांनी येथे वर्चस्व मिळवले.   

खरे तर, येथे भाजपा नेत्या पंकजा मुंडे आणि अजित दादांच्या राष्ट्रवादीचे प्रकाश सोळंके, असा राजकीय सामना रंगला होता. ही निवडणूक पंकजा मुंडेसांठी प्रतिष्ठेची मानली जात होती. मात्र, येथे भाजपला २० पैकी केवळ ६ जागा मिळाल्या. तर अजित पवारांच्या राष्ट्रवादीला ११ जागा आणि शरद पवार गटाला 3 जागा मिळाल्या आहेत. पंकजा मुंडे यांच्यासाठी हा धक्का मानला जात आहे. या निकालासंदर्भात बोलताना काय म्हणाल्या पंकडा मुंडे? -“आम्ही परळीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाबरोबर युती केली होती. इतर ठिकाणी आम्ही लढलो. त्यापैकी परळी नगर परिषद, गेवराई नगर परिषद आणि अंबाजोगाई नगर परिषदेत आम्ही जिंकलो आहोत. इतर ठिकाणी अगदी टस्सल सुरू आहे. कारण तेथे गेल्या पाच वर्षांत आमचे आमदार नाहीत. कुठली सत्ता नाही. कार्यकर्त्यांना फारसा आधार न देताही ते संपूर्ण शक्तीने उबे राहिले. धारूरमध्ये आमचा निसटता पराभव झाला आहे. मला आनंद आहे. आमचा, धारूरमध्ये थोडक्यात पराभव झाला असला तरी, आम्ही अंबाजोगाई जी कधीही मिळवली नाही, ती मिळवली आहे. जनतेने आमच्यावर विश्वास ठेवला आणि प्रेम दाखवत सकारात्मक कौल दिला. त्याबद्दल मी जनतेचे आभार मानते," असे पंकजा यांनी म्हटले आहे.

...म्हणून महत्वाचे आहेत हे निकाल -  दरम्यान, साधारणपणे गेल्या चार वर्षांपासून प्रलंबित असलेल्या स्तानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका न्यायालयाच्या आदेशानंतर आता होत आहेत. यांपैकी राज्यातील २८८ नगरपरिषदा आणि नगरपंचायतींच्या निवडणुका पार पडल्या. ज्याचे निकाल आज जाहीर होत आहेत. महत्वाचे म्हणजे, राज्यातील विधानसभा निवडणुकीनंतर या निवडणुका पार पडल्या. यामुळे यांच्या निकालांनाही विशेष महत्त्व आहे.

 

English
हिंदी सारांश
Web Title : Setback for Pankaja Munde: BJP Loses All Seats in Dharur

Web Summary : In a blow to Pankaja Munde, BJP lost all seats in Dharur Nagar Parishad elections. Ajit Pawar's NCP dominated. Munde acknowledged the defeat, highlighting wins elsewhere, attributing Dharur loss to lack of local power. Local elections are crucial after a four-year delay.
टॅग्स :Municipal Electionमहानगरपालिका - नगरपालिका निवडणूक २०२६Local Body Electionमहाराष्ट्र स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक निकाल २०२५Pankaja Mundeपंकजा मुंडेBJPभाजपाAjit Pawarअजित पवारNCPराष्ट्रवादी काँग्रेस