दरोड्याच्या गुन्ह्यातील फरार आरोपी जेरबंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 16, 2019 23:37 IST2019-05-16T23:36:13+5:302019-05-16T23:37:01+5:30
येथील पोलीस ठाण्याच्या हद्दीत सहा वर्षांपूर्वी झालेल्या दरोड्याच्या गुन्ह्यातील फरार आरोपीला अखेर जेरबंद करण्यात आले.

दरोड्याच्या गुन्ह्यातील फरार आरोपी जेरबंद
तलवाडा : येथील पोलीस ठाण्याच्या हद्दीत सहा वर्षांपूर्वी झालेल्या दरोड्याच्या गुन्ह्यातील फरार आरोपीला अखेर जेरबंद करण्यात आले. रुई येथील माणिक बाबासाहेब नवले या सहा वर्षांपासून फरार होता. त्याच्याविरुद्ध तलवाडा पोलिस ठाण्यात गुरनं १३६/२०१३ कलम ३९५ भादंवि तसेच मागील वर्षी मारहाण प्रकरणी गुन्हा दाखल होता. अनेकवेळा पोलिसांना तो चकवा देत होता. अखेर रुई येथील एका हॉटेलमध्ये माणिक नवले असल्याची माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर सहायक पोलीस निरीक्षक मारोती मुंडे यांनी माणिकच्या मुसक्या आवळल्या. या कारवाईत एएसआय चव्हाण यांनी सहकार्य केले.