भयंकर! दोघा भावांची घरे पेट्रोल टाकून पेटवली; सहा जणांना झोपेतच जिवंत जाळण्याचा प्रयत्न

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 7, 2023 19:27 IST2023-11-07T19:26:39+5:302023-11-07T19:27:09+5:30

दोन्ही कुटुंबांना घरातच जीवंत जाळण्याच्या या प्रकाराने खळबळ उडाली आहे. 

Terrible! The houses of the two brothers were set on fire with petrol; An attempt was made to burn six people alive in their sleep | भयंकर! दोघा भावांची घरे पेट्रोल टाकून पेटवली; सहा जणांना झोपेतच जिवंत जाळण्याचा प्रयत्न

भयंकर! दोघा भावांची घरे पेट्रोल टाकून पेटवली; सहा जणांना झोपेतच जिवंत जाळण्याचा प्रयत्न

-मधुकर सिरसट
केज:
तालुक्यातील ढाकेफळ येथील हनुमान मंदीराशेजारील दोन पत्र्याच्या शेडला पेट्रोल टाकून पेटवून दिल्याची धक्कादायक घटना आज पहाटे अडीज वाजता घडली. या भयंकर घटनेत दोन चुलत भावांच्या कुटुंबातील एकूण ६ जण बालंबाल बचावले.मात्र, सर्वजण आगीने भाजून जखमी झाले आहेत.दोन्ही कुटुंबांना घरातच जीवंत जाळण्याच्या या प्रकाराने खळबळ उडाली आहे. 

नात्याने सख्खे चुलत भाऊ असलेले गोविंद दिलीप थोरात व वैजेनाथ व्यंकटी थोरात हे दोघे पत्नी, मुलांसह गावातील हनुमान मंदिरा जवळ पत्र्याच्या शेडमध्ये राहतात. सोमवारी रात्री जेवण करुन दोन्ही कुटुंबे घरात झोपले होते. अचानक पहाटे अडीज वाजता अज्ञात व्यक्तीने पेट्रोल टाकून दोन्ही शेड पेटवून दिली. आगीचा मोठा भडका उडाल्याने घरातील सर्वजण जागे झाले. आगीचे लोळ पाहून गोविंद व वैजनाथसह घरातील लहान मुलांनी आरडाओरड केली. त्यामुळे शेजारचे नागरीक जागे झाले. अनेकांनी पेटलेल्या घराकडे धाव घेतली.गावातील धनराज थोरात या युवकांनी जिवाची पर्वा न करता या दोन्ही घरांचे पत्रे काढून लहान लेकरांसह सर्वांना सुखरुप घराबाहेर काढले.

दरम्यान, आगीत वैजनाथ थोरात, त्यांची पत्नी भाजून जखमी झाले आहेत. दोन्ही चुलत भावांसह त्यांचे कुटुंबियांना  जीवे मारण्याच्या उद्देशानेच हे कृत्य केल्याची चर्चा गावकरी करीत होते. याप्रकरणी गोविंद थोरात यांच्या फिर्यादीवरुन युसुफवडगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेची माहिती मिळताच सहाय्यक पोलिस निरीक्षक योगेश उबाळे यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. पुढील तपास पोलीस उप निरीक्षक रामदास काळे हे करीत आहेत. थोरात बंधु हे भाजीपाल्याचे व्यापारी आहेत.पैश्यांच्या देवाणघेवाणीतून हा प्रकार झाल्याची शक्यता असल्याची माहिती पोउनि काळे यांनी दिली आहे.

 

Web Title: Terrible! The houses of the two brothers were set on fire with petrol; An attempt was made to burn six people alive in their sleep