शहरं
Join us  
Trending Stories
1
तुम्हाला राजकारणात मुलं होत नाही, त्यात आमचा दोष काय?; उद्धव ठाकरेंचा घणाघात
2
रिकामे झाले, दुसरीकडे काम, भाजपचा फॉर्म्युला; अनेक नेत्यांना दुसऱ्या मतदारसंघात पाठवले
3
आरक्षणाची मर्यादा ७३ टक्के करणार, शेतकऱ्यांना कर्जमाफी देऊ; राहुल गांधी यांची पुण्यातील सभेत घोषणा
4
एकनाथ खडसेंच्या प्रवेशाला विरोध कशाला असेल ? वार्तालापात विनाेद तावडे यांनी मांडली भूमिका
5
पहिल्या भाषणानंतर बाळासाहेबांनी दिलेला 'तो' सल्ला राज ठाकरेंनी कायम लक्षात ठेवला
6
उद्धव यांच्या आजारपणात मोदी करायचे विचारपूस ; पंतप्रधानांच्या विधानावर राजकीय टोलेबाजी सुरू
7
Wipro चे संस्थापक अझीम प्रेमजी बँकिंग क्षेत्रात उतरणार; 'या' बँकेतील हिस्सा खरेदी करण्याच्या तयारीत
8
सरकारने सर्वसामान्यांचे जगणे मुश्कील केले; आदित्य ठाकरेंचा हल्लाबोल
9
आजचे राशीभविष्य - ४ मे २०२४; आज आपणास खूप मोठा आर्थिक लाभ होईल
10
रावसाहेब दानवे षटकार मारणार ? जालन्यात चुरशीची लढाई, भाजपचा वरचष्मा; मविआ कमकुवत!
11
तिकीट तर कापले, आता पुनर्वसनाचा प्रश्न, महायुतीने १२ विद्यमान खासदारांना बसवले घरी
12
शेतकरी संकटात असताना केंद्राकडून सत्तेचा गैरवापर सुरू ; शरद पवार यांची टीका
13
जादूटोण्याच्या संशयातून दोघांना जिवंत जाळले; घरात मृत्युसत्र, १५ जणांना अटक
14
मुंबईत मराठी टक्का कोणाच्या फायद्याचा? मराठी मते आपल्याच झोळीत पाडून घेण्यासाठी घमासान रंगणार
15
भाजपने १२ केंद्रीय मंत्र्यांना तिकीट नाकारले; निकालावर ११ केंद्रीय मंत्र्यांचे भवितव्य ठरणार
16
ॲड. उज्ज्वल निकम २८ कोटींचे मालक; एक कार, अंधेरी, जळगाव आणि दहिसर येथे घरे
17
आता ‘त्या’ महिलेच्या अपहरणाचाही गुन्हा दाखल; पाच दिवसांपासून बेपत्ता असल्याची तक्रार दाखल
18
रवींद्र वायकर यांच्या मालमत्तेत ६ कोटींनी वाढ; २०१९ मध्ये १० कोटी १९ लाखांची संपत्ती
19
या निवडणुकीतला पहिला हेलिकॉप्टर अपघात; महाड येथील दुर्घटना, पायलट किरकोळ जखमी
20
नरेश म्हस्के यांच्याकडे २६ कोटींची संपत्ती; तीन कार, ३ कोटी ६२ लाखांचे कर्ज

टॉवरच्या बॅटऱ्या चोरणारे ‘टेक्निशिअन’ गजाआड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 11, 2019 11:59 PM

खाजगी दूरसंचार कंपनीच्या टॉवर विभागात ‘टेक्निशिअन’ म्हणून रूजू झाले. काही दिवस चांगले काम केले. नंतर त्यांनी कामातील ‘टेक्निक’ चोरीसाठी वापरली. जेथे काम करीत होते, तेथीलच बॅट-या चोरल्या.

ठळक मुद्देदोन गुन्हे उघड : स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

बीड : खाजगी दूरसंचार कंपनीच्या टॉवर विभागात ‘टेक्निशिअन’ म्हणून रूजू झाले. काही दिवस चांगले काम केले. नंतर त्यांनी कामातील ‘टेक्निक’ चोरीसाठी वापरली. जेथे काम करीत होते, तेथीलच बॅट-या चोरल्या. अशा बॅट-या चोरणारे दोन ‘टेक्निशिअन’ स्थानिक गुन्हे शाखेने गजाआड केले आहेत. त्यांनी दोन गुन्हेही कबुल केल्याचे पोलीस सूत्रांकडून समजते.भाऊसाहेब हरिश्चंद्र हंडिबाग (३२, रा.केज) व सुनील भगवान नेहरकर (२२ रा. धावडी ता. अंबाजोगाई) अशी पकडलेल्या दोन चोरांची नावे आहेत. त्यांचा अन्य एक सहकारी अद्यापही फरार आहे.केज, अंबाजोगाई, धारूर आणि उस्मानाबाद जिल्ह्यात मागील काही दिवसांपासून टॉवरच्या बॅटºया चोरीचे गुन्हे वाढले होते. धारूर, युसूफवडगाव पोलीस ठाण्यात तशी नोंदही झाली होती. त्यानंतर स्थानिक गुन्हे शाखेने तपास हाती घेतला. सपोनि अमोल धस यांनी कौशल्यपूर्ण तपास करून दोघांना ताब्यात घेतले. खाक्या दाखविताच त्यांनी गुन्हे कबूल केले.दरम्यान, दोन्ही चोरटे खाजगी दूरसंचार कंपनीच्या टॉवर विभागात ‘टेक्निशिअन’ म्हणून कार्यरत होते. त्यांना काय केल्यावर काय होऊ शकते, याची जाणीव होती. त्यामुळेच त्यांनी चार बॅटºया असतील तर तीन चोरायच्या आणि एक जागेवर ठेवायची. शेवटच्या बॅटरीची चार्जिंग संपल्यानंतर संबंधित कंपनीला संदेश जायचा. तोपर्यंत या चोरांनी संपूर्ण प्रक्रिया पार पाडलेली असायची. मात्र एलसीबीच्या तावडीतून ते सुटू शकले नाहीत. त्यांचा अन्य एक साथीदार अद्यापही फरार असून, त्याला लवकरच ताब्यात घेऊ, असे सपोनि धस यांनी सांगितले. सध्या दोन्ही चोरटे धारूर पोलिसांच्या ताब्यात आहेत.ही कारवाई पोलीस अधीक्षक जी.श्रीधर पोनि घनश्याम पाळवदे यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि अमोल धस, भास्कर केंद्रे, कल्याण तांदळे, राजू वंजारे आदींनी केली.

टॅग्स :BeedबीडBeed policeबीड पोलीसtheftचोरीArrestअटक