शहरं
Join us  
Trending Stories
1
वातावरण विरोधात जातंय हे पाहून देवेंद्र फडणवीसांनी...; जयंत पाटलांचा गंभीर आरोप
2
"भाजप भयभीत, UCC मुळे हिंदूंना…"; ममता बॅनर्जी यांचा केंद्र सरकारवर निशाणा
3
निलेश लंकेंना मोठा दिलासा; अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी अनेक नाट्यमय घडामोडी!
4
अमित शहांच्या 'त्या' फेक व्हिडिओवर PM मोदींची पहिली प्रतिक्रिया; काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल...
5
ओला कॅब्सचे सीईओ हेमंत बक्षी यांचा राजीनामा; 10 टक्के कर्मचाऱ्यांना काढून टाकण्याची तयारी
6
सुरेश रैनाने T20 World Cup 2024 साठी निवडला परफेक्ट संघ; गोलंदाजीत अनपेक्षित निवड
7
हातोडावाले तात्या रोड रोलर घेऊन पुण्यात फिरणार; वसंत मोरेंचे निवडणूक चिन्ह जाहीर
8
"मी जिवंत असेपर्यंत काँग्रेसला..."; पंतप्रधान मोदींनी साताऱ्याच्या सभेत विरोधकांना भरला सज्जड दम
9
'रामायण' साठी ही डिझायनर जोडी फायनल, संजय लीला भन्साळींशी आहे कनेक्शन
10
उद्धव ठाकरेंना शरद पवारांनी राजीनामा द्यायला लावला, राऊतांचा पाठिंबा होता; शिंदे गटाचा दावा
11
अमित शाह यांच्या फेक व्हिडिओ प्रकरणात एकाला अटक, कोण अडकलं? CM हिमंता यांनी दिली माहिती
12
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाचा उपकर्णधार कोण? मोठी अपडेट समोर
13
VIDEO : 'लेव्हल सबके निकलेंगे' मधील व्हायरल मुलगी खरंच कोट्यधीश झाली का?
14
गुरुचरण सिंग यांचे वडील बोलण्याच्या मनस्थितीत नाहीत; नातेवाईक म्हणाले, 'त्याच्या लग्नाबद्दल...'
15
निवडणूक आली की मोदींना महाराष्ट्र आठवला का, गुजरातला उद्योग नेताना...; काँग्रेसची टीका
16
"माझं एक लग्न पंतप्रधान मोदींमुळे मोडलं..."! पाकिस्तानातील मुफ्तीचा दावा, व्हिडिओ व्हायरल
17
MS Dhoni Rocked, काव्या Shocked! हेडसाठी सापळा रचला अन् SRH मालकीणचा चेहरा पडला 
18
तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंथ रेड्डींना पोलिसांनी थेट दिल्लीला बोलवले, सोबत फोनही घेऊन येण्याच्या सूचना
19
'निवडणूक आयोगाला आम्ही आदेश देऊ शकत नाही'; हायकोर्टाने फेटाळली मोंदींविरोधातील याचिका
20
Vastu Shastra: कणभर मोहरीचे मणभर फायदे; घराच्या प्रवेश द्वाराशी मोहरी ठेवा आणि वास्तु दोष घालवा!

युतीची चर्चा गेली खड्ड्यात, शेतकऱ्यांचे बोला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 10, 2019 12:59 AM

युतीची चर्चा गेली खड्ड्यात माझ्या शेतक-यांचे बोला अशा शब्दात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपवर शरसंधान साधले.

ठळक मुद्देउद्धव ठाकरे : भाजपवर साधले शरसंधान; घोषणांचे जुमले सुरु असल्याचा आरोप

लोकमत न्यूज नेटवर्कबीड : मराठवाडा दुष्काळाने होरपळतोय प्रशासकीय यंत्रणेला देणेघेणे नाही, तिकडे सरकारने १० हजार कोटींच्या कर्जमाफीची घोेषणा केली, दिले काय? शेतकºयांचा सर्वत्र आक्रोश आहे. त्यांना काम, चारा, पाणी पाहिजे. युतीची चर्चा गेली खड्ड्यात माझ्या शेतक-यांचे बोला अशा शब्दात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपवर शरसंधान साधले.जिल्ह्यातील दुष्काळग्रस्त शेतक-यांना दिलासा देण्यासाठी बुधवारी आयोजित कार्यक्रमात ते बीड येथे आले होते. यावेळी शेतक-यांना पशूखाद्य, पाण्याच्या टाक्याचे वाटप त्यांच्या हस्ते झाले.ठाकरे म्हणाले, कोरडी भाषणे आणि घोषणा देऊन जमत नसते. चारा छावणीला की दावणीला असा घोळ सुरुच आहे. सरकारला यंत्रणा राबवता येत नाही, आमची यंत्रणा समोर असल्याचे सांगत उपस्थित श्रोत्यांकडे अंगुलीनिर्देश केला. विहिरी, जलाशये कोरडे आहेत. त्यामध्ये पाणी नाही, परंतु शेतकºयांच्या डोळ्यात पाणी आहे. दुष्काळ सदृष्य म्हणत खेळ चालवलाय, केंद्रीय पथक आले, मिळाले काय? हे पथक लेझीम पथक होते का? गाजर दाखवता पण गाजरही देत नसल्याचा टोला त्यांनी सरकारला लगावला.यावेळी उज्वला योजनेचे कनेक्शन किती जणांना मिळाले? पीक विम्याचे पैसे किती जणांना मिळाले? कर्जमाफी किती जणांना झाली? असे प्रश्न विचारत ठाकरे म्हणाले, कर्जमाफी नव्हे शिवसेनेला कर्जमुक्ती पाहिजे. अन्नदात्याला खोटं बोलून फसवतात? कर्जमाफी का झाली नाही? पात्र ठरुनही कर्जमाफी मिळत नाही. घोषणांचे सोंग आणि ढोंग करु नका अशी टीका करताना मी ‘मन’ की नव्हे ‘जन की बात’ करतो, असे ठाकरे यांनी स्पष्ट केले.राम मंदिराबाबत सरकारच्या भूमिकेवर बोलताना ठाकरे म्हणाले, हा विषय घटनापीठाकडे टोलविला. मग निवडणूक जाहीरनाम्यात का उल्लेख केला ? मंदिर वहीं बनायेंगे, तारिख नहीं बतायेंगे असेच चालले आहे. शिवसेना मात्र पहले मंदिर फिर सरकार यावर ठाम असल्याचे ते म्हणाले.जुमल्यावर जुमले, घोषणांचे जुमले सुरु आहेत. रामाचासुद्धा जुमला करत आहेत. घोषणांचा पाऊस करुन दुष्काळग्रस्त जनतेचे हंडे भरणार नाहीत, केलेल्या घोषणांची अंमलबजावणी करा, तुमचे दिवसच किती उरले? असेही उद्धव ठाकरे म्हणाले.केवळ जनतेसाठी दुष्काळ नसून बीड जिल्ह्यात राजकारणासाठी शिवसेनेचा दुष्काळ आहे. शिवसेनेचा राजकीय दुष्काळ हटविण्याचे आवाहन करताना ‘दुष्काळ गंभीर, शिवसेना खंबीर’ असल्याचे ठाकरे म्हणाले.‘लोकमत’ लोकांचे मतसरकारच्या घोषणा कशा फसव्या आहेत, हे सांगताना त्यांनी ९ जानेवारी रोजीच्या ‘लोकमत’मध्ये प्रकाशित बातमीचा वारंवार उल्लेख करून अंक दाखविला.अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाकडे व्यवसाय करण्यासाठी राज्यात कर्ज मागणा-यांची संख्या ३० हजारांवर आहे आणि प्रत्यक्षात मात्र ६ हजार लोकांनाच कर्ज मिळणार, अशी बातमी ‘लोकमत’च्या मराठवाडा आवृत्तीने छापली होती.याचा उल्लेख करून ते म्हणाले की, ‘लोकमत’ने छापले आहे. लोकांचे मत आहे, असा उल्लेख त्यांनी आपल्या भाषणात ‘लोकमत’चा अंक दाखवून केला.

टॅग्स :BeedबीडUddhav Thackerayउद्धव ठाकरेShiv SenaशिवसेनाBJPभाजपा