गाडीवरील ताबा सुटल्याने अपघातात तलाठ्याचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 19, 2020 09:19 IST2020-12-19T09:19:05+5:302020-12-19T09:19:27+5:30
आष्टी तालुक्यातील कडा येथील घटना

गाडीवरील ताबा सुटल्याने अपघातात तलाठ्याचा मृत्यू
कडा- काम आवरून रात्री नऊच्या दरम्यान शेरी येथे घराकडे जात असतांना गाडीवरील अचानक ताबा सुटुन झालेल्या अपघातात एका तलाठ्याचा मृत्यू झाल्याची घटना बीड नगर रोडवर कडा येथे घडली. पोपट नारायण गोरे असे मयत झालेल्या तलाठ्याचे नाव आहे.
आष्टी तालुक्यातील शेरी बुद्रुक येथील पोपट नारायण गोरे हे पाटोदा तालुक्यातील भायाळा येथे कार्यरत होते. शुक्रवारी काम उरकुन ते कड्यात आले. कड्यात आल्यावर घरगुती काम उरकताना उशीर झाला. रात्री नऊच्या दरम्यान स्वतःच्या ग गाडीत (क्रमांक MH 16, BH 5758 ) घराकडे निघाले. एका वळणावर येताना त्यांचा अचानक ताबा सुटल्याने गाडी रस्त्याच्या खाली गेली. या अपघातात त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या निधनाने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.