‘लोकन्यायालयाचा लाभ घ्या’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 9, 2018 12:23 AM2018-12-09T00:23:24+5:302018-12-09T00:23:40+5:30

पैसा आणि वेळेची बचत होण्यासाठी जनतेने लोकन्यायालयाचा लाभ घेऊन तडजोडीने प्रकरण मिटवावे असे आवाहन प्रमुख जिल्हा व सत्र न्या. प्राची कुलकर्णी यांनी केले.

Take advantage of 'Lok Daunda' | ‘लोकन्यायालयाचा लाभ घ्या’

‘लोकन्यायालयाचा लाभ घ्या’

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
बीड : पैसा आणि वेळेची बचत होण्यासाठी जनतेने लोकन्यायालयाचा लाभ घेऊन तडजोडीने प्रकरण मिटवावे असे आवाहन प्रमुख जिल्हा व सत्र न्या. प्राची कुलकर्णी यांनी केले. शनिवारी येथील जिल्हा व सत्र न्यायालयात आयोजित लोकअदालतच्या उद्घाटनप्रसंगी त्यांनी आवाहन केले.
यावेळी जिल्हा न्या-१ बी. व्ही. वाघ, जिल्हा विधि सेवा प्राधिकरणचे सचिव न्या. शरद देशपांडे, सर्व न्यायिक अधिकारी, जिल्हा वकील संघाचे सचिव अ‍ॅड. विष्णूपंत काळे, जिल्हा सरकारी वकील मिलींद वाघिरकर आदी व्यासपीठावर उपस्थित होते.
यावेळी न्या. शरद देशपांडे म्हणाले, लोकन्यायालयात विरुद्ध शब्द नसतो. दोन्ही पक्षकार वादी - प्रतिवादी हे सारखेच असतात. लोकअदालतमध्ये मोटार अपघात, भूसंपादन, दिवाणी, फौजदार चेक बॅँक, फायनान्स तसेच न्यायलयासह विविध बॅँका, दूरसंचारची दाखलपूर्व प्रकरणे दाखल होती.
या प्रकरणांची पॅनलनिहाय विभागणी करण्यात आली होती. लोकअदालतच्या यशस्वीतेसाठी न्या. वाघ, न्या. गांधी, न्या. हुद्दार, न्या. पौळ, न्या. बेग, न्या. दाभाडे, न्या. पताळे, न्या. जमादार, न्या. बेडककर, न्या. खाडे, न्या. बोंद्रे, न्या. सय्यद, न्या. राऊत, न्या. डोमाळे यांच्यासह अ‍ॅड. बोडखे, अ‍ॅड. साबळे, अ‍ॅड. विलास जोशी, अ‍ॅड. बडे, अ‍ॅड. भोसले, अ‍ॅड. महाजन, अ‍ॅड. येवले, अ‍ॅड. टाकसाळ तसेच इतरांनी परिश्रम घेतले. लोकअदालतीला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

Web Title: Take advantage of 'Lok Daunda'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.