दिंद्रुडमध्ये चोरट्यांचा धुमाकूळ; एकाच रात्री तीन घरफोड्या; रोकडसह ६ लाखांचा मुद्देमाल लंपास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 3, 2021 13:12 IST2021-09-03T13:11:31+5:302021-09-03T13:12:10+5:30

चार ते पाच चोरट्यांनी दिंद्रुडमध्ये धुमाकूळ घातला

A swarm of thieves in Dindrud; Three burglaries in one night; Looted worth Rs 6 lakh with cash | दिंद्रुडमध्ये चोरट्यांचा धुमाकूळ; एकाच रात्री तीन घरफोड्या; रोकडसह ६ लाखांचा मुद्देमाल लंपास

दिंद्रुडमध्ये चोरट्यांचा धुमाकूळ; एकाच रात्री तीन घरफोड्या; रोकडसह ६ लाखांचा मुद्देमाल लंपास

दिंद्रुड ( बीड ) : माजलगाव तालुक्यातील दिंद्रुड येथे शुक्रवारी मध्यरात्री तीन ठिकाणी धाडसी चोरीच्या घटना घडल्या. अहिल्यानगर आणि इतर दोन ठिकाणी चोरट्यांनी घरफोडी करत रोख रक्कम आणि दागिने असा ६ लाखांचा मुद्देमाल लंपास केला. चार ते पाच चोरटे असल्याची प्राथमिक माहिती आहे.

अहिल्यानगर येथे मध्यरात्री दोनच्या सुमारास चोरट्यांनी रवी सोन्नवर यांच्या घरात प्रवेश केला. चोरट्यांनी खोल्यांच्या बाहेरून कड्या यावेळी लावत स्वयंपाक घरात प्रवेश केला. स्वयंपाक घरातील पेटीतील अंदाजे पाच ते सहा लाख रुपयांचे सोन्याचे दागिने व रोख पंधरा हजार रक्कम चोरट्यांनी लंपास केली.

अन्य एका ठिकाणी अनिस असेफ शेख यांच्या घरात चोरट्यांनी घुसत कपाट फोडून दीड तोळा सोने व चांदी लंपास केली. बालु काचगुंडे यांच्या दरवाजाचे कुलूप तोडून चोरांनी आत प्रवेश केला. मात्र, काचगुंडे यांना जाग आल्याने चोराटे रिकाम्या हाताने केले. या चोरट्यांनी तोडलेली सर्व कुलूप सोबत नेली. चोरी करत असताना शेजारी घरांच्या कड्या बाहेरून लावल्या होत्या. शुक्रवारी सकाळी दिंद्रुड पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी केली असून पुढील तपास सुरु आहे.

Web Title: A swarm of thieves in Dindrud; Three burglaries in one night; Looted worth Rs 6 lakh with cash