सालेवडगाव येथील स्वामी शामसुंदर महाराज पुरी यांचे निधन
By अनिल लगड | Updated: August 26, 2022 15:11 IST2022-08-26T15:11:13+5:302022-08-26T15:11:56+5:30
अहमदनगर येथील खाजगी रुग्णालयात उपचारादरम्यान झाले निधन

सालेवडगाव येथील स्वामी शामसुंदर महाराज पुरी यांचे निधन
अंभोरा (बीड) : आष्टी तालुक्यातील रामतीर्थ सालेवडगाव येथील ह.भ.प भागवताचार्य स्वामी शामसुंदर महाराज पुरी यांचे शुक्रवारी पहाटे २ वाजेच्या सुमारास निधन झाले.
गुरुवारी आनंदवाडी येथील तपपूर्ती सप्ताहात काल्याचे किर्तन संपल्यानंतर त्यांना हृदयविकाराचा तीव्र त्रास जाणवू लागला होता. त्यानंतर अहमदनगर येथील खाजगी रुग्णालयात उपचारासाठी त्यांना दाखल करण्यात आले. येथेच उपचारादरम्यान त्यांचे पहाटे २ वाजेच्या सुमारास निधन झाले. निधनाची वार्ता समजताच भाविकांनी त्यांच्या अंत्यदर्शनासाठी सालेवडगाव येथे गर्दी केली आहे. संपूर्ण परिसर शोकसागरात बुडाला आहे. वारकरी क्षेत्रात एक मोठी पोकळी निर्माण झाल्याच्या भावना भाविकांनी व्यक्त केल्या. सायंकाळी सालेवडगाव येथील राम मंदिर आवारात समाधी सोहळा पार पडणार आहे.