गेवराई तालुक्यात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे चक्का जाम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 19, 2018 17:01 IST2018-07-19T16:58:58+5:302018-07-19T17:01:42+5:30
दुध उत्पादकाच्या अनुदानाच्या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने तालुक्यातील राक्षसभुवन फाटा येथे चक्का जाम आंदोलन करण्यात आले.

गेवराई तालुक्यात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे चक्का जाम
गेवराई (बीड ) : दुध उत्पादकाच्या अनुदानाच्या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने तालुक्यातील राक्षसभुवन फाटा येथे चक्का जाम आंदोलन करण्यात आले.
दुध उत्पादकांना न्याय देण्यासाठी उत्पादकाच्या खात्यावर थेट प्रति लिटर 5 रूपये अनुदान जमा करण्याच्या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने आज सकाळी 11 वाजता राक्षसभुवन फाटा येथे चक्का जाम आंदोलन करण्यात आले. यावेळी शासनाच्या दुध उत्पादकांबद्दलच्या धोरणाचा निषेध करण्यात आला.
आंदोलनात यावेळी पुजा मोरे, कुलदीप करपे, राजु गायके, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे तालुकाध्यक्ष राजेंद्र डाके, रोहिदास चव्हाण, उध्दव साबळे, भाऊसाहेब डिंगरे, वचिष्ठ बेडके, भारत सुखदेव, बाळु घेवारे, दिगांबर आहेर, संदिपान डाके, किरण बेदरे, गणेश जगंले आदींचा सहभाग होता.