मजुराचा संशयास्पद मृत्यू; मृतदेह पोलीस ठाण्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 14, 2018 00:26 IST2018-10-14T00:25:33+5:302018-10-14T00:26:11+5:30

पुणे जिल्ह्यात मुकादमासोबत गेलेल्या ऊसतोड मजुराचा शुक्रवारी मृत्यू झाला. याबाबत संशय व्यक्त करीत मुकादमाविरोधात कारवाई करावी, या मागणीसाठी शनिवारी नातेवाईकांनी मृतदेह थेट बीड ग्रामीण ठाण्यात आणला. पोलिसांकडून कारवाईचे आश्वासन मिळाल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.

Suspicious death of laborer; The dead body of the police station | मजुराचा संशयास्पद मृत्यू; मृतदेह पोलीस ठाण्यात

मजुराचा संशयास्पद मृत्यू; मृतदेह पोलीस ठाण्यात

ठळक मुद्देबीडमधील घटना : पोलिसांकडून चौकशीच्या आश्वासनानंतर आंदोलन मागे

लोकमत न्यूज नेटवर्क
बीड : पुणे जिल्ह्यात मुकादमासोबत गेलेल्या ऊसतोड मजुराचा शुक्रवारी मृत्यू झाला. याबाबत संशय व्यक्त करीत मुकादमाविरोधात कारवाई करावी, या मागणीसाठी शनिवारी नातेवाईकांनी मृतदेह थेट बीड ग्रामीण ठाण्यात आणला. पोलिसांकडून कारवाईचे आश्वासन मिळाल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.
रमेश रामभाऊ कानाडे (४२ रा.किन्हीपाई ता.बीड) हे तीन दिवसांपूर्वी पुणे जिल्ह्यातील इंदापुर येथील साखर कारखान्यावर उसतोडणीसाठी मुकादमासोबत गेले होते. शुक्रवारी त्यांचा मृत्यू झाला. यावर संशय व्यक्त करीत मुकादम बापू धुताडमल व राधाकिशन गुंड यांच्यावर कारवाई करावी, या मागणीसाठी नातेवाईक आक्रमक झाले होते. मृतदेह असलेली रूग्णवाहीका थेट बीड ग्रामीण ठाण्यात आणण्यात आली. पोलिसांकडून अश्वासन मिळाल्यानंतर मृतदेह ठाण्यातून नेण्यात आला. यामुळे काहीवेळ तणाव निर्माण झाला होता.

Web Title: Suspicious death of laborer; The dead body of the police station

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.