परळी गटसाधन केंद्रातील चोरी उघडकीस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 8, 2018 23:32 IST2018-04-08T23:32:36+5:302018-04-08T23:32:36+5:30
मार्च एंड नंतर सलग तीन दिवस कार्यालय बंद असल्याची संधी साधून चोरट्यांनी परळी येथील गटसाधन केंद्र फोडून आतील संगणक इ. मुद्देमालाची चोरी केली होती. अल्पावधीतच या चोरीचा छडा लावण्यात संभाजीनगर पोलिसांना यश आले असून या प्रकरणी एकास ताब्यात घेण्यात आले आहेत तर अन्य एक फरार आहे. पोलिसांनी चोरी गेलेला मुद्देमालही जप्त केला आहे.

परळी गटसाधन केंद्रातील चोरी उघडकीस
लोकमत न्यूज नेटवर्क
परळी : मार्च एंड नंतर सलग तीन दिवस कार्यालय बंद असल्याची संधी साधून चोरट्यांनी परळी येथील गटसाधन केंद्र फोडून आतील संगणक इ. मुद्देमालाची चोरी केली होती. अल्पावधीतच या चोरीचा छडा लावण्यात संभाजीनगर पोलिसांना यश आले असून या प्रकरणी एकास ताब्यात घेण्यात आले आहेत तर अन्य एक फरार आहे. पोलिसांनी चोरी गेलेला मुद्देमालही जप्त केला आहे.
३० मार्च रोजी रात्री १० वाजता शिक्षकांच्या आॅनलाईन बदली बाबत माहीती भरुन कर्मचाऱ्यांनी गटसाधन केंद्र बंद करून निघून गेले. त्यानंतर सलग तीन दिवस सुट्या झाल्या. २ एप्रिल रोजी कार्यालय पुन्हा उघडले असता आतील तीन संगणक चोरीला गेल्याचे आढळून आले. याची तक्रार संभाजीनगर पोलिसांत देण्यात आली.
संभाजीनगर पोलिसांनी तातडीने सूत्रे हलवीत मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे परळी शहरातील भीमवाडी भागातील धनराज संजय वाहुळे यास ताब्यात घेतले. पोलिसी खाक्या दाखविताच त्याने अन्य एकासोबत मिळून चोरी केल्याचे कबूल केले. चोरीतील मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे. सदर आरोपीस न्यायालयाने १९ एप्रिल पर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली. या चोरीतील अन्य एक आरोपी मात्र अद्याप फरार असून पोलीस त्याचा कसून शोध घेत आहेत. ही कारवाई अपर पोलीस अधीक्षक अजित बोराडे यांच्या विशेष पथक व संभाजीनगर पोलीस अंमलदार रमेश सिरसाट यांनी पार पाडली.