शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

वाल्मीक कराडची 'कॉल रेकॉर्डिंग' व्हायरल करणारा मकोकातील सनी आठवलेला पुण्यात बेड्या!

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 24, 2026 15:01 IST

एलसीबीची धडाकेबाज कारवाई; वर्षभरापासून गुंगारा देणारा 'आठवले गँग'चा गुंड अखेर गजाआड

बीड : बीडमधील पोलिस अधिकारी आणि वाल्मीक कराड यांच्या संभाषणाची कथित ऑडिओ क्लिप व्हायरल करून खळबळ उडवून देणारा 'मकोका'मधील फरार आरोपी सनी शामराव आठवले याला स्थानिक गुन्हे शाखेने पुण्यातून बेड्या ठोकल्या आहेत. गेल्या वर्षभरापासून पोलिसांना चकमा देणाऱ्या सनीला शुक्रवारी दुपारी ताब्यात घेण्यात आले आहे.

१३ डिसेंबर २०२४ रोजी बीड शहरातील पेठ बीड भागात झालेल्या गोळीबाराच्या घटनेनंतर 'आठवले गँग'वर मकोका लावला होता. या टोळीवर खुनाचा प्रयत्न, खंडणी आणि अवैध शस्त्र बाळगण्यासारखे तब्बल १९ गंभीर गुन्हे दाखल आहेत. टोळीचा म्होरक्या अक्षय आठवले याला पोलिसांनी यापूर्वीच अटक केली होती, मात्र सनी आठवले आपले अस्तित्व लपवून फरार होता. पोलिस निरीक्षक शिवाजी बंटेवाड, उपनिरीक्षक महेश विघ्ने, हवालदार महेश जोगदंड, जफर पठाण, बप्पासाहेब घोडके, मनोज परजणे आणि विकी सुरवसे यांच्या पथकाने पुण्यात सापळा रचून सनीला ताब्यात घेतले. वर्षभर पोलिसांना गुंगारा देणाऱ्या सनीच्या अटकेमुळे 'आठवले गँग'ला मोठा धक्का बसला आहे.

ऑडिओ क्लिपमुळे आले होते चर्चेतसनी आठवले हा केवळ गुन्हेगारीमुळेच नाही, तर पोलिस निरीक्षक शितलकुमार बल्लाळ आणि वाल्मीक कराड यांची कथित ऑडिओ क्लिप व्हायरल केल्यामुळे राज्यभर चर्चेत आला होता. या क्लिपमुळे पोलिस दलाची मोठी नाचक्की झाली होती. तेव्हापासून पोलिस त्याच्या मागावर होते. अखेर स्थानिक गुन्हे शाखेला तो पुण्यात असल्याची पक्की माहिती मिळाली. त्यानंतर सापळा रचून बेड्या ठोकल्या.

कायम कंबरेला गावठी कट्टासनी आठवले हा कायम कंबरेला गावठी कट्टा लावून फिरत असतो. त्याच्याविराेधात शिवाजीनगर, पेठबीड, केज आणि बीड शहर या पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत. त्याने अनेकदा गोळीबार करून जिवे मारण्याचा प्रयत्न केलेला आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : MCOCA accused who leaked audio clip arrested in Pune.

Web Summary : Sunny Athawale, wanted in a MCOCA case for circulating an audio clip, was arrested in Pune after a year on the run. He faces 19 charges, including attempted murder and extortion. The arrest is a major blow to the Athawale gang.
टॅग्स :walmik karadवाल्मीक कराडBeed Crimeबीड क्राईम मराठी बातम्या