अंबाजोगाईत तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 8, 2019 15:32 IST2019-04-08T15:31:58+5:302019-04-08T15:32:39+5:30

रात्री जेवण करुन घरातील सर्व मंडळी झोपी गेल्यानंतर केली आत्महत्या

Suicide of youth in Ambajogai | अंबाजोगाईत तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या

अंबाजोगाईत तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या

अंबाजोगाई (बीड ) : मोरेवाडी भागातील पाण्याची टाकी परीसरातील राहत्या घरी पत्र्याच्या आडुला तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केली. अमोल श्रीराम क्षिरसागर (३५ ) आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. 

नगर पालिकेतील इलेक्ट्रीक कंत्राटदार श्रीराम क्षिरसागर यांचा मुलगा अमोल हा मोंढ्यात मोटारी दुरुस्तीचे काम करत होता. रात्री जेवण करुन घरातील सर्व मंडळी झोपी गेल्यानंतर अमोलने गच्छीवरील पत्र्याच्या रुममध्ये आडुला गळफास घेऊन आत्महत्या केली. सकाळी हा प्रकार लक्ष्यात आल्यानंतर याची माहीती पोलिसांना देण्यात आली. त्याच्या   पार्थीवाची स्वाराती रुगणालयात उत्तरीय तपासणी करुन मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. आत्महत्येचे कारण अद्याप स्पष्ट झाले नाही.

Web Title: Suicide of youth in Ambajogai