धारुर ग्रामीण रुग्णालयात कर्मचाऱ्याची आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 25, 2021 12:08 IST2021-09-25T12:08:07+5:302021-09-25T12:08:39+5:30

पोलिस घटनास्थळी दाखल झाले असून पुढील तपास सुरु आहे 

Suicide of an employee at Dharur Rural Hospital | धारुर ग्रामीण रुग्णालयात कर्मचाऱ्याची आत्महत्या

धारुर ग्रामीण रुग्णालयात कर्मचाऱ्याची आत्महत्या

धारूर  : शहरातील ग्रामीण रुग्णालयात एका 35 वर्षीय कर्मचाऱ्याने रात्री गळफास घेवून आत्महत्या केल्याचे सकाळी उघडकीस आले. खोलेश्वर बाबूराव निर्मळ असे मृताचे नाव आहे. घटनास्थळी पोलिस दाखल झाले आहेत.

धारुर शहरातील ग्रामीण रुग्णालयात असलेल्या 108 रुग्णवाहिकेच्या  चालकाने गळफास घेवून आत्महत्या केली आहे. सदरील चालक  रुग्णालय परिसरात असलेल्या कर्मचारी निवासस्थानी राहत होता. सध्या घरी एकटाच असून रात्री गळफास घेत आत्महत्या केल्याची प्राथमिक माहिती मिळाली. खोलेश्वर बाबूराव निर्मळ असे मृताचे नाव आहे. घटनेचे माहिती पोलिसांना देण्यात आली असून घटनास्थळी पोलिस दाखल झाले आहेत. आत्महत्येचे कारण अद्याप समोर आलेले नाही. मयत रुग्णवाहिका चालक हा गेल्या सहा वर्षांपासुन कंत्राटी पध्दतीवर काम करत होता.

Web Title: Suicide of an employee at Dharur Rural Hospital