माजलगावात तरुणीची जाळून घेऊन आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 22, 2018 18:57 IST2018-09-22T18:56:52+5:302018-09-22T18:57:29+5:30

दत्त कॉलनी येथे एका तरुणीने घरात कोणी नसताना जाळून घेऊन आत्महत्या केल्याची घटना आज दुपारी घडली.

Suicide by burning a young girl in Majalgaon | माजलगावात तरुणीची जाळून घेऊन आत्महत्या

माजलगावात तरुणीची जाळून घेऊन आत्महत्या

माजलगांव (बीड ): दत्त कॉलनी येथे एका तरुणीने घरात कोणी नसताना जाळून घेऊन आत्महत्या केल्याची घटना आज दुपारी घडली. स्वाती सुधाकर नाईकनवरे (२२) मृत तरुणीचे नाव आहे. 

शिक्षक असलेले सुधाकर नाईकनवरे दत्त कॉलनी येथे राहतात. त्यांची मुलगी स्वाती आज दुपारी घरी एकटीच होती. साडेबारा वाजेच्या दरम्यान तिने अंगावर रॉकेल ओतून पेटवून घेतले. यामध्ये जळून तिचा जागीच मृत्यू झाला. घटनास्थळी पोलिस दाखल झाले असुन पंचनामा सुरू आहे. स्वातीच्या आत्महत्येचे कारण अद्याप अस्पष्ट आहे.
 

Web Title: Suicide by burning a young girl in Majalgaon