विद्यार्थ्यांनी निष्ठेने कार्यप्रवण असावे-मंजुषा मिसकर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 29, 2021 04:19 IST2021-03-29T04:19:58+5:302021-03-29T04:19:58+5:30
कृषि महाविद्यालय, अंबाजोगाई अंतर्गत रासेयोच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या उपक्रमात, अप्पर जिल्हाधिकारी यांच्या कार्यालय परिसरात स्वच्छता मोहीम राबवण्यात आली. ...

विद्यार्थ्यांनी निष्ठेने कार्यप्रवण असावे-मंजुषा मिसकर
कृषि महाविद्यालय, अंबाजोगाई अंतर्गत रासेयोच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या उपक्रमात, अप्पर जिल्हाधिकारी यांच्या कार्यालय परिसरात स्वच्छता मोहीम राबवण्यात आली.
या अनुषंगाने वृक्षसंवर्धन, प्लास्टिक निर्मूलन, परिसर सुशोभीकरण इत्यादी कामे करण्यात आली. याप्रसंगी राष्ट्रीय सेवा योजनेच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करते वेळी अप्पर जिल्हाधिकारी मंजुषा मिसकर म्हणाल्या की, युवकांनी कामाच्या शोधात राहून राष्ट्रहित जोपासत निष्ठेने व जिद्दीने कार्यप्रवण राहावे. त्या पुढे असेही म्हणाल्या की, राष्ट्रीय सेवा योजनेचा विद्यार्थी प्रत्येक वळणावर यशस्वी होतो.
या प्रसंगी कृषी महाविद्यालय अंबाजोगाई चे सहयोगी अधिष्ठाता व प्राचार्य डॉ. बाबासाहेब ठोंबरे, रासेयो चे कार्यक्रम अधिकारी डाॅ. बसवलिंगाप्पा कलालबंडी, डाॅ. सुहास जाधव, डाॅ. नरेशकुमार जायेवार, डाॅ. योगेश वाघमारे हे उपस्थित होते.
===Photopath===
280321\avinash mudegaonkar_img-20210328-wa0060_14.jpg
===Caption===
कृषि महाविद्यालय, अंबाजोगाई अंतर्गत रासेयोच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या उपक्रमात अप्पर जिल्हाधिकारी मंजुषा मिसकर दिसत आहेत.