विद्यार्थी पालक मेळावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 21, 2021 04:31 IST2021-03-21T04:31:54+5:302021-03-21T04:31:54+5:30
कोविड १९ महामारीच्या प्रादुर्भावामुळे उद्भवलेल्या परिस्थितीस तोंड देण्याकरिता प्रत्यक्ष भेटीऐवजी ऑनलाइन पालक मेळावा घेण्यात आला. याप्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. ...

विद्यार्थी पालक मेळावा
कोविड १९ महामारीच्या प्रादुर्भावामुळे उद्भवलेल्या परिस्थितीस तोंड देण्याकरिता प्रत्यक्ष भेटीऐवजी ऑनलाइन पालक मेळावा घेण्यात आला. याप्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. महेंद्र गौशाल, डॉ. गणेश पांगारकर उपप्राचार्य यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. या प्रसंगी महाविद्यालयातील शिस्त, नियम व अटींबद्दल, रॅगिंगविरोधी नियमांबद्दल तसेच महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या विविध विद्यार्थी उपयोगी योजनांची माहिती प्राचार्य गौशाल यानी विद्यार्थी व पालकांना दिली. फार्मसी विभागाच्या प्रमुख डॉ अंजली पवार, अनॉटॉमी विभागाचे प्रमुख डॉ. शेख जफरअली, डॉ. ज्ञानेश्वर जोशी इत्यादी प्रथमवर्ष बीएचएमएसचे शिक्षक या प्रसंगी उपस्थित होते. बैठकीचे सूत्रसंचालन प्रा. रावसाहेब हंगे यांनी केले.
===Photopath===
200321\20bed_6_20032021_14.jpg
===Caption===
येथील सोनाजीराव क्षीरसागर होमिओपॅथिक वैद्यकीय महाविद्यालयामध्ये बीएचएमएस प्रथम वर्ष २०२०-२१ या शैक्षणिक वर्षात प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांची व त्यांच्या पालकांची ऑनलाइन पद्धतीने स्वागत बैठक संपन्न झाली.