वाळू माफियांकडून तलाठ्यास मारहाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 30, 2018 12:44 AM2018-06-30T00:44:42+5:302018-06-30T00:45:04+5:30

Struggling with the Sand Mafia | वाळू माफियांकडून तलाठ्यास मारहाण

वाळू माफियांकडून तलाठ्यास मारहाण

Next

गेवराई : अवैध वाळू वाहतूक करणारे दोन ट्रॅक्टर का पकडले? म्हणून वाळू माफियांनी जातेगाव सज्जाचे तलाठी व्ही.व्ही. आमलेकर यांना ट्रॅक्टरमधून खाली ओढत बेदम मारहाण केली. तसेच जिवे मारण्याची धमकी दिल्याची घटना शुक्रवारी दुपारी जातेगाव नजीक सेलूतांडा ते गेवराई रोडवर घडली. याप्रकरणी दोन आरोपी विरोधात तलवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. यातील एकाला बेड्या ठोकल्या आहेत. दरम्यान,तालुक्यात वाळू माफियांकडून महसूल अधिकारी यांना वारंवार होणारी मारहाण व जीवे मारण्याची धमकी यामुळे अधिकाऱ्यांना कामे करणे जिकरीचे बनले आहे.

आमलेकर हे जातेगाव तलाठी सज्जा हद्दीत दैनंदिन कामे करत असताना सेलूतांडा ते गेवराई रोडवर दोन विनानंबरचे टॅÑक्टर अवैध वाळू घेऊन जाताना त्यांनी पकडले. यानंतर ट्रॅक्टर चालक अशोक जगताप याने मालकाला याची माहिती देताच मालक बंडू घाटूळ हे (एमएच२३/एए११) या क्र मांकाच्या दुचाकीवरुन घटनास्थळी दाखल झाला. यानंतर घाटूळ याने तलाठी आमलेकर यांना ‘तु ट्रॅक्टर का पकडलेस’ म्हणून धक्काबुक्की करत मारहाण केली. तसेच ट्रॅक्टरच्या चाकाखाली घालून मारण्याचा प्रयत्न देखील केला. मात्र प्रसंगावधान राखल्याने माझा जीव वाचला असून जिवे मारण्याची धमकी दिल्याचे फिर्यादीत नमूद आहे. याप्रकरणी बंडू घाटूळ व अशोक जगताप विरोधात तलवाडा ठाण्यात गुन्हा दाखल झाला.

क्लिप ‘व्हायरल’
अवैध वाळू घेऊन चाललेले ट्रॅक्टर पकडल्यानंतर आरोपी बंडू घाटूळ याने तलाठी आमलेकर यांना ट्रॅक्टरमधून खाली ओढत केलेल्या मारहाणीचा व्हिडिओ सोशल मीडियावर ‘व्हायरल’ झाला
या घटनेचा निषेध करीत महसूल राजपत्रित अधिकारी, कर्मचारी, तलाठी संघटनेने शनिवारी लेखणी बंद आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे. तसे निवेदनही त्यांनी तयार करुन जिल्हा नियोजन अधिका-यांना दिले आहे.

Web Title: Struggling with the Sand Mafia

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.