लोकमत न्यूज नेटवर्कमाजलगाव : सध्या शेतकरी दुष्काळाने त्रस्त असताना साखर कारखाने शेतकऱ्यांची अडवणूक करीत आहेत. कारखान्यांनी २६५ जातीचा ऊस घ्यावा यासह तालुक्यातील दुष्काळ निवारण त्वरित करण्यात यावे, या मागण्यांसाठी गंगाभिषण थावरे यांच्या नेतृत्वाखाली बुधवारी शेतकरी संघर्ष समितीच्या वतीने परभणी चौकात रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.तालुक्यातील दुष्काळ निवारणाची कामे त्वरित सरू करण्यात यावेत, या मागणीसह दोन वर्षांपूर्वी माजलगाव तालुक्यातील तीन साखर कारखान्यांची बैठक घेऊन २६५ जातीचा ऊस घेणार नसल्याचे जाहीर केले होते.परंतु त्यानंतर साखर आयुक्तांशी झालेल्या बैठकीनंतर कारखान्यांनी तसे आदेश दिले होते. त्यानंतर कारखान्यांनी हा ऊस उचलला परंतु पुन्हा कारखाने आडकाठी आणत आहेत. त्यामुळे शेतकरी हवालदिल आहे. आधीच दुष्काळ त्यातच हुमनी अळीने ऊसाचे वाळवण झाले. अनेक शेतकºयांचा ऊस पाण्याअभावी जळून जात आहे. गत वर्षी कारखान्यांनी घेतलेल्या उसाचे बिल दिले नाही. यात माजलगाव कारखाना ) ८०० रू.टन, छत्रपती कारखाना ७०० रु .टन, जय महेश कारखाना ४५० रु .टन प्रमाणे बिल दिलेले नाही. हे बिल आता दिले तर शेतकºयांना दुष्काळात मदत होईल. त्यामुळे ते त्वरित देण्यात यावे गेटकनचा ऊस आणू नये, सरसगट कर्ज माफी करावी, रोजगार हमीची कामे सुरू करावीत, यासह इतर मागण्यांसाठी परभणी चौकात बुधवारी शेतकरी संघर्ष समितीच्या वतीने गंगाभिषण थावरे यांच्या मार्गदर्शनाखाली बैलगाडी बारदाण्यासह एक तास रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. आंदोलनकर्त्यांनी यावेळी आपल्या मागण्यांचे निवेदन तहसीलदार एन.जी.झम्पलवाड यांना दिले. दरम्यान यावेळी मोठया प्रमाणात वाहतुकीची कोंडी निर्माण झाली होती.सरसकट कर्ज माफीची केली मागणीदुष्काळ निवारणाची कामे त्वरित सुरू करण्यात यावीत, या मागणीसह कारखान्यांनी २६५ जातीचा ऊस गाळपासाठी न्यावा, गेटकेनचा ऊस आणू नये, सरसकट कर्जमाफी करुन रोजगार हमीची कामे सुरू करण्याची केली मागणीपरभणी चौकात झालेल्या रास्ता रोको आंदोलनामुळे रस्त्यावरील दोन्ही बाजुस वाहतुकीची कोंडी झाल्याने वाहतूक ठप्प झाली होती. सदरील आंदोलन एक ते दीड तास चालले. तहसीलदारांना निवेदन देण्यात आले.
माजलगाव येथे शेतकरी संघर्ष समितीचा रास्ता रोको
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 22, 2018 00:46 IST
सध्या शेतकरी दुष्काळाने त्रस्त असताना साखर कारखाने शेतकऱ्यांची अडवणूक करीत आहेत. कारखान्यांनी २६५ जातीचा ऊस घ्यावा यासह तालुक्यातील दुष्काळ निवारण त्वरित करण्यात यावे, या मागण्यांसाठी गंगाभिषण थावरे यांच्या नेतृत्वाखाली बुधवारी शेतकरी संघर्ष समितीच्या वतीने परभणी चौकात रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.
माजलगाव येथे शेतकरी संघर्ष समितीचा रास्ता रोको
ठळक मुद्देबारदाण्यासह आंदोलन : कारखान्यांनी २६५ जातीचा ऊस न्यावा, रोजगार हमीची कामे सुरू करण्याची मागणी