जुगार अड्ड्यावर कारवाईस गेलेल्या पोलिसांवर दगडफेक; सहाय्यक पोलिस निरीक्षक गंभीर जखमी

By ऑनलाइन लोकमत | Published: April 7, 2023 11:40 AM2023-04-07T11:40:29+5:302023-04-07T11:41:01+5:30

माजलगाव तालुक्यातील छत्रबोरगाव येथील यात्रेतील प्रकार

Stones pelted on police who went into action at gambling den; Assistant Police Inspector seriously injured | जुगार अड्ड्यावर कारवाईस गेलेल्या पोलिसांवर दगडफेक; सहाय्यक पोलिस निरीक्षक गंभीर जखमी

जुगार अड्ड्यावर कारवाईस गेलेल्या पोलिसांवर दगडफेक; सहाय्यक पोलिस निरीक्षक गंभीर जखमी

googlenewsNext

- पुरुषोत्तम करवा

माजलगाव (बीड) : तालुक्यातील छत्रबोरगाव येथे यात्रेच्या आडून सुरु असलेल्या जुगार अड्ड्यावर कारवाईसाठी गेलेल्या पोलिसांवर दगडफेक झाल्याची घटना गुरुवारी रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास झाली. यामध्ये ग्रामीण पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक योगेश खटकळ हे जखमी झाले आहेत. दगडफेक करणाऱ्या व्यक्तीविरुद्ध ग्रामीण पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

चैत्र महिना असल्याने तालुक्यात अनेक ठिकाणी यात्रा भरत असतात त्याचप्रमाणे छत्र बोरगाव येथे देखील देवीची यात्रा भरली आहे. यात्रास्थळी सोरट नावाचा जुगार चालू असल्याची माहिती ग्रामीण पोलीसांना मिळाली. यावरून कारवाईसाठी एक पोलीस पथक जुगार अड्ड्यावर धडकले. जुगार अड्डा बंद करण्यासाठी सांगितले असता पोलीस व जुगार चालक यांच्यात वाद झाला. यावेळी अचानक पोलिसांवर दगडफेक सुरु झाली. यामध्ये ग्रामीण पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक योगेश खटकळ यांना २ ते ३ ठिकाणी गंभीर दुखापत झाली.

सपोनि योगेश खटकळ यांच्या फिर्यादीवरून परमेश्वर रावसाहेब जाधव ,परमेश्वर विठ्ठल जाधव, अक्षय परमेश्वर जाधव यांच्यासह इतर अज्ञात १५ ते २० लोकांवर ग्रामीण पोलीसात शासकीय कामात अडथळा आणल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक विजयसिंह जोनवल हे करत आहेत.

Web Title: Stones pelted on police who went into action at gambling den; Assistant Police Inspector seriously injured

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.