शहरं
Join us  
Trending Stories
1
आले किती, गेले किती...! एकट्या दिल्लीत ५००० पाकिस्तानी, IB ने यादी सोपविली; पुढे काय...
2
पहलगाम हल्ल्यातील मृतांच्या वारसांना शासकीय नोकरी देण्याबाबत मुख्यमंत्र्यांचं मोठं वक्तव्य; म्हणाले...
3
मुदत संपली! मायदेशात परतण्यासाठी पाकिस्तानी नागरिकांची धावाधाव, वाघा बॉर्डरवर रांगा...
4
पहलगाम हल्ल्याचा तपास NIA च्या हाती; पाकिस्तानी कनेक्शन अन् 26/11 सारख्या कटाचा संशय
5
पाकिस्तान प्रेग्नेंट, कधीही बलुचिस्तानची डिलीवरी होऊ शकते; विकास दिव्यकीर्ती यांनी पाकिस्तानची परिस्थिती सांगितली
6
सोलापूर डॉक्टर आत्महत्या: कॉल रेकार्डमधील माहितीमध्ये नवा पुरावा आढळणार?
7
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
8
Pahalgam Terror Attack : "मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
9
पती झाला हैवान! बहिणीच्या लग्नासाठी भावाने घर विकलं, हुंड्यासाठी सासरच्यांनी तिलाच मारलं
10
पहलगाम हल्ल्यानंतर दहशतवादाविरुद्धची कारवाई तीव्र, आतापर्यंत १० घरे उद्ध्वस्त; १७५ संशयितांना ताब्यात
11
शिक्षक, स्पर्धा परीक्षांची तयारी अन् अचानक झाला गायब; २६ पर्यटकांना मारणारा आदिल दहशतवादी कसा बनला?
12
प्रभसिमरन सिंगने इतिहास रचला, आयपीएलमध्ये खास विक्रम करणारा पहिला अनकॅप्ड खेळाडू ठरला
13
वंदे भारत आणि शताब्दी एक्सप्रेस गाड्यांचा खरा मालक कोण? अनेकांच्या मनात गैरसमज
14
नरेश म्हस्के यांची ज्ञानपीठच्या दिशेने वाटचाल होत आहे, सावधान..!
15
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
16
अनंत अंबानींना रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये मिळाली मोठी जबाबदारी; आकाश आणि ईशा अंबानी काय करतात?
17
"मी दहशतवाद्यांना एकच गोष्ट सांगेन की..."; 'केसरी २'च्या स्क्रीनिंगला अक्षय कुमारचा संताप अनावर, काय घडलं?
18
तुम्ही मराठी सिनेसृष्टीत आजवर असं कधीच पाहिलं नसेल! 'माझी प्रारतना'चा विलक्षण ट्रेलर रिलीज
19
WhatsApp मध्ये सीक्रेट चॅटसाठी आलं नवं फीचर; आता प्रायव्हसीचं टेन्शन होणार छूमंतर
20
घरी आणि ऑफिस दोन्ही ठिकाणी Wi-Fi? मग 'हे' रिचार्ज प्लॅन तुमच्यासाठी बेस्ट; कोण देतंय चांगली ऑफर?

पोट भरण्याची मारामार; मी टॅक्स कशाला भरू?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 22, 2021 04:37 IST

बीड : जन्मानंतर बाळाच्या पॅडपासून ते आयुष्याची वाटचाल आणि मृत्यूनंतरही कफनसाठी सर्वसामान्यांना अत्यक्ष व अप्रत्यक्ष विविध कर भरावाच लागतो. ...

बीड : जन्मानंतर बाळाच्या पॅडपासून ते आयुष्याची वाटचाल आणि मृत्यूनंतरही कफनसाठी सर्वसामान्यांना अत्यक्ष व अप्रत्यक्ष विविध कर भरावाच लागतो. अलिकडच्या दोन वर्षांत जीवनावश्यक वस्तुंच्या महागाईने कळस गाठला आहे. अशावेळी ‘पोट भरण्याची मारामार, मी टॅक्स कशाला भरू? असता त्रागा सर्वसामान्यांकडून व्यक्त केला जातो. परंतू जनतेच्या पैशातूनच सरकारला कर मिळतो आणि तोच पैसा सार्वजनिक उपक्रमांच्या विकासावर खर्च केला जातो. कर भरणा नियमित केल्यास नागरिकांची आपोआप पत वाढते. स्वत:ची प्रगती करण्यासाठी करप्रणालीनुसार भरणा करणे सामान्यांच्या हिताचे आहे. टॅक्सच भरला नाही तर विकास कसा होणार, असा सूर अर्थ क्षेत्रातील तज्ज्ञ व्यक्त करतात.

अनेक जण कर चुकवतात तर अनेक जण कर भरणाही करतात. तुम्ही व्यवसाय करत असाल किंवा नोकरी, शासनाच्या नियमानुसार पाच लाखांपेक्षा जास्त उत्पन्न असेल तर आयकर भरावा लागतो. परंतू याआधी साधारण करदात्यांना २० हजारांपर्यंत कर भरणा करावा लागत होता. आता तो भरणा करावा लागत नाही. मुलांना शिक्षण मोफत मिळत असलेतरी गुरूजींचा पगार, शाळा इमारती उभारणी किंवा दुरुस्ती, शासकीय नोकरदारांचा पगार किंवा विविध क्षेत्रात विकासाच्या संकल्पना मांडत असताना नागरिकांचा कर भरणा महत्त्वाचे अंग आहे. देशाची प्रगती या विविध करातून संकलित होणाऱ्या रकमेतूनच होत असते. वस्त्रापासून भौतिक सुविधेच्या म्हणा किंवा खाद्यपदार्थ, औषधी आदी बाजारातील वस्तू खरेदी करताना जीएसटी अप्रत्यक्षरित्या वसूल केला जातो. जीवन जगताना स्थानिक यंत्रणेकडेही कर भरणा करावाच लागतो.

१) आपण टॅक्स भरता का? ( बॉक्स. खाली दिलेल्या प्रत्येकाकडून फक्त एका ओळीत आपण टॅक्स भरता का ही विचारणा करावी)

कामगार - कर भरत नाही, पण नगर पालिकेचा मालमत्तेचा कर, वीज बिल, खरेदीतून कर भरावाच लागतो.

ऑटो चालक - मला रिक्षाचा रोडटॅक्स, भरावा लागतो.

भाजीपाला विक्रेता - नगर पालिका जागेचा कर घेते.

फेरीवाला -- नगर पालिका कर घेते, खाद्यपदार्थ असतील करत अन्न परवाना घ्यावा लागतो.

सिक्युरिटी गार्ड -मी आयकर भरत नाही, पण मला मिळणाऱ्या वेतनातून कपात होते.

साफ सफाई कामगार- मी कर भरत नाही

सलून चालक - शॉप ॲक्ट, जागेचा कर भरतो.

लॉन्ड्री चालक -- शॉप ॲक्ट, वीज बिलाद्वारे कर भरतोच

घर काम करणाऱ्या महिला - कर भरत नसलेतरी इतर खरेदी करताना जीएसटी अप्रत्यक्ष द्यावाच लागतो.

२) प्रत्येकजण टॅक्स भरतो

आयकर, जीएसटी, लोकल बॉडी टॅक्स (एलबीटी), टोल टॅक्स, रोड टॅक्सच्या माध्यमातून प्रत्येक जण प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष कर भरणा करतोच. पाच लाख रुपयांच्या पुढे उत्पन्न असेल तर प्रत्यक्ष कर भरावा लागतो. त्याआतील व्यक्तींना कर भरावा लागत नाही. सरकारला मिळणाऱ्या करातूनच व्यवसथा चालते. कर भरणा केल्यास आपली पत वाढते. बँकेकडून कर्ज मिळण्यातील अडचणी दूर होऊ शकते. स्वत:च्या व देशाच्या विकासासाठी उत्पन्नानुसार कर भरणे हिताचेच आहे. मात्र कर संकलन मधमाशीप्रमाणे असावे, जेणेकरून सामान्य घटकाला त्रास होणार नाही. - आदेश नहार, सी. ए. बीड

---------