पुण्यात चोरलेल्या दुचाकी बीडमध्ये विक्री; चोरट्याला बेड्या ठाेकून सात दुचाकीही जप्त 

By सोमनाथ खताळ | Updated: December 11, 2023 19:28 IST2023-12-11T19:28:23+5:302023-12-11T19:28:36+5:30

स्थानिक गुन्हे शाखेला एकाकडे चोरीची दुचाकी असल्याची माहिती मिळाली होती.

Stolen two-wheeler in Pune for sale in Beed; Thieves were handcuffed and seven bikes were also seized | पुण्यात चोरलेल्या दुचाकी बीडमध्ये विक्री; चोरट्याला बेड्या ठाेकून सात दुचाकीही जप्त 

पुण्यात चोरलेल्या दुचाकी बीडमध्ये विक्री; चोरट्याला बेड्या ठाेकून सात दुचाकीही जप्त 

बीड : पुण्यात दुचाकी चोरून बीड जिल्ह्यात विक्री करणाऱ्या चोरट्याला स्थानिक गुन्हे शाखेला बेड्या ठोकल्या आहेत. त्याच्याकडून दोन बुलेटसह सात दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत. सोमवारी ही कारवाई करण्यात आली.सुरज शंकर गायकवाड (रा.बीड) असे चोरट्याचे नाव असून विशाल दादाभाऊ देवडकर (रा.बीड) हा दुचाकी खरेदी करत होता.

स्थानिक गुन्हे शाखेला विशालकडे चोरीची दुचाकी असल्याची माहिती मिळाली होती. त्यांनी विशालकडून बुलेट ताब्यात घेतली. नंतर विविध अशा ७ दुचाकी विक्री केल्याचे समजले. मग विशालच्या मदतीने पोलिसांनी सुरजचा पत्ता शोधला आणि त्यालाही ताब्यात घेतले. विशालने पुण्यातून दुचाकी चोरल्याची कबुली दिली. या सर्व सातही दुचाकी जप्त केल्या आहेत. तसेच सुरज व विशाल यांच्याविरोधात शिवाजीनगर पोलिस ठाण्यात फसवणूक व चोरट्याला मदत केल्याने गुन्हा दाखल केला आहे.

ही कारवाई पोलिस अधीक्षक नंदकुमार ठाकुर, अपर पोलीस अधीक्षक सचिन पांडकर यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संतोष साबळे, पोलीस उप निरीक्षक संजय तुपे, तुळशिराम जगताप, कैलास ठोंबरे, अशोक दुबाले, राहुल शिंदे, नसीर शेख, भागवत शेलार, देविदास जमदाडे, विकी सुरवसे, चालक गणेश मराडे आदींनी केली.

Web Title: Stolen two-wheeler in Pune for sale in Beed; Thieves were handcuffed and seven bikes were also seized