जेथून चोरली दुचाकी, तेथेच विक्रीला आला अन् पोलिसांनी पकडला

By सोमनाथ खताळ | Updated: October 6, 2023 21:48 IST2023-10-06T21:47:51+5:302023-10-06T21:48:42+5:30

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई: तीन वर्षांपूर्वी बीडमधून पळविली दुचाकी.

stolen bike was sold there and caught by the police | जेथून चोरली दुचाकी, तेथेच विक्रीला आला अन् पोलिसांनी पकडला

जेथून चोरली दुचाकी, तेथेच विक्रीला आला अन् पोलिसांनी पकडला

सोमनाथ खताळ, बीड : बीड शहरातील शिवाजीनगर पोलिस ठाणे हद्दीतून तीन वर्षांपूर्वी गेवराई तालुक्यातील चोरट्याने दुचाकी पळवली होती. तीच दुचाकी विक्रीसाठी तो आता त्याच पोलिस ठाणे हद्दीत आला होता. याची माहिती मिळताच स्थानिक गुन्हे शाखेने त्याला बेड्या ठोकल्या. ही कारवाई शनिवारी करण्यात आली.beebed

दिनेश भगवान मगर (वय ३० रा.सिरसमार्ग ता.गेवराई) असे पकडलेल्या चोरट्याचे नाव आहे. ती वर्षापूर्वी दिनेशने दुचाकी चोरली होती. याप्रकरणी शिवाजीनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. चोरीची ही दुचाकी दिनेश स्वता: वापरत होता. हीच दुचाकी विक्रीसाठी तो शहरातील शिवाजीनगर पोलिस ठाण्यासमोरील भागात आला होता. ही माहिती एलसीबीला मिळताच त्यांनी सापळा लावला. गाडी विक्री करण्याआधीच त्याला बेड्या ठाेकल्या. ही कारवाई पोलिस अधीक्षक नंदकुमार ठाकूर, अपर अधीक्षक सचिन पांडकर, पोलिस निरीक्षक संतोष साबळे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक संजय तुपे, कैलास ठोंबरे, राहुल शिंदे, तुळशीराम जगताप, बप्पासाहेब घोडके, भागवत शेलार यांनी केली.

Web Title: stolen bike was sold there and caught by the police