राज्य सरकारने एमपीएससी परीक्षेचा गोंधळ थांबवावा - A
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2021 05:00 IST2021-03-13T05:00:23+5:302021-03-13T05:00:23+5:30
यासंदर्भात पुढे बोलताना आ. धस म्हणाले की, मुला-मुलींचे वाढते वय तसेच त्यांनी केलेली तयारी याचा विचार राज्य सरकारने करावा. ...

राज्य सरकारने एमपीएससी परीक्षेचा गोंधळ थांबवावा - A
यासंदर्भात पुढे बोलताना आ. धस म्हणाले की, मुला-मुलींचे वाढते वय तसेच त्यांनी केलेली तयारी याचा विचार राज्य सरकारने करावा. जी मुले, मुली खुल्या प्रवर्गातून एमपीएससी परीक्षाला येणार आहेत, त्यांच्या परीक्षा होऊन जाव्यात. या आरक्षणाच्यामार्फत जे मुले परीक्षा देणार आहेत. आरक्षित जागा ठेवून बाकीच्या परीक्षा घेण्यास राज्य सरकारला काही हरकत नाही. आरोग्य, महावितरण इतर ठिकाणी परीक्षा घेऊन जागा भरल्या जात आहेत. याबाबत आ. पडळकर यांनीदेखील प्रातिनिधिक स्वरूपात आंदोलन करत विद्यार्थ्यांच्या भावना सरकारसमोर मांडल्या. आत्तापर्यंत मराठा आरक्षणाचा या सरकारने काडीमात्र विचार केला नाही आणि आता एमपीएससीबाबत विचार करून हे सरकार दोन समाजामध्ये तेढ निर्माण करीत आहे. हा गोंधळ थांबवावा कोरोनाचे कारण दाखवत १४ मार्चला होणारी एमपीएससीची परीक्षा पुन्हा एकदा राज्य सरकारने लांबणीवर टाकत मुलांची दिशाभूल केली आहे. ती नियोजित वेळेतच घ्यावी. अशा या गोंधळलेल्या सरकारने कमीत कमी मुलांच्या भवितव्याचा व आजपर्यंत दिलेल्या त्यागाचा विचार करणे गरजेचे असताना, विचारपूर्वक निर्णय घेण्याऐवजी तातडीने चुकीचे निर्णय हा या गोंधळलेल्या सरकारने घेतला आहे. तातडीने परीक्षा घेण्याचा निर्णय या सरकारने घ्यावा. विद्यार्थी रस्त्यावर उतरलेले आहेतच, आम्ही देखील याबाबत रस्त्यावर उतरू, असा इशारा विधान परिषदेचे आ. सुरेश धस यांनी दिला आहे.