दगडफेक करणाऱ्या दोघांना मारहाण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 1, 2019 23:56 IST2019-09-01T23:55:54+5:302019-09-01T23:56:43+5:30
शहरातील भाजपच्या एका नेत्याच्या घरावर दगडफेक करुन पळून जाणाºया दोघांचा पाठलाग करीत जमावाने मारहाण केली. ही घटना रविवारी रात्री ९.३० ते १० च्या सुमारास घडली.

दगडफेक करणाऱ्या दोघांना मारहाण
बीड : शहरातील भाजपच्या एका नेत्याच्या घरावर दगडफेक करुन पळून जाणाºया दोघांचा पाठलाग करीत जमावाने मारहाण केली. ही घटना रविवारी रात्री ९.३० ते १० च्या सुमारास घडली.
मिळालेल्या माहितीनुसार राजीव गांधी चौक परिसरात एका नेत्याच्या घरावर दोघांनी दगडफेक केली. व ते पॉर्इंटवरील एका जीपमधून पळून गेले. दरम्यान, या दोघांचा पाठलाग सदर नेत्याच्या कार्यकर्त्यांनी केला. बार्शी रोडवरील एका पंपाजवळ डिझेल भरण्यासाठी दोघे असलेली जीप थांबली असता पाठलाग करीत आलेल्या अंदाजे सात ते आठ जणांनी त्यांना बेदम मारहाण केली. या मारहाणीत मोहन कल्याण गवते (बेलुरा) व उमेश रेवणनाथ कोटूळे (वरवटी) यांच्या डोक्याला मार लागला असून, ते जखमी झाले आहेत. त्यांना जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे.
घटनेची माहिती मिळताच पो. नि. शिवलाल पुर्भे, उपनिरीक्षक दराडे व सहकाऱ्यांनी घटनास्थळी भेट दिली. पोलीस उपअधीक्षक भास्कर सावंत यांनी रुग्णालयात भेट दिली.