शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहारच्या राजकारणात नवं समीकरण! भाजपाला पहिल्यांदाच मुख्यमंत्रिपद; सम्राट चौधरी घेणार शपथ, निशांत कुमार उपमुख्यमंत्री
2
दक्षिण चीन सागरात १७ हजार सैनिक का जमले?; चीनच्या वर्चस्वाला थेट आव्हान देण्याची ७ देशांची तयारी
3
तारीख ठरली...! सर्वात मोठी अट इराणला मान्य? 'पीस टॉक-२' संदर्भात अमेरिकेची मोठी घोषणा
4
होर्मुझच्या नाकेबंदीत अमेरिकेची झाली फजिती; मेथेनॉल घेऊन चीनचा टँकर सुरक्षित बाहेर पडला
5
पराभवांतून धडा घ्या किंवा एकटे पडून राहा! सलग तिसऱ्या पराभवानंतर कर्णधार हार्दिक संतापला
6
गेल्या ९ वर्षांपासून अक्षय्य तृतीयेला Gold देतंय जबरदस्त रिटर्न, यावेळीही इतिहासाची पुनरावृत्ती होणार का?
7
Video - १२ महिन्यांत फेडलं ८० लाखांचं कर्ज; अमेरिकेतील भारतीय तरुणीच्या कर्तृत्वाने जग अवाक
8
अमरावतीत अल्पवयीन मुलींचे अश्लील व्हिडिओ व्हायरल; १९ वर्षीय अयान अहमदला पोलिसांनी केली अटक
9
PNB मध्ये ६० महिन्यांच्या FD मध्ये ₹२,००,००० जमा केले तर किती मिळेल व्याज? पाहा कॅलक्युलेशन
10
स्मरण दिन अन् गुरुवार, सलग २ दिवस सेवा करायची सुवर्ण संधी; स्वामी महाराज शुभ तेच होईल!
11
स्वामी समर्थ पुण्यतिथी: 'स्वामी' म्हणजे नक्की कोण? 'या' शब्दाचा गर्भितार्थ तुम्हाला माहीत होता का?
12
"रस्ते आणि उड्डाणपूल म्हणजे विकास नाही"; राज ठाकरेंनी करुन दिली बाबासाहेबांच्या समग्र दृष्टीची आठवण
13
Video - नियतीचा खेळ! वैष्णोदेवीच्या दर्शनाला गेली बहीण, ५ वर्षांपूर्वी हरवलेला भाऊ 'भिकारी' म्हणून आला समोर
14
Noida Protest: हिंसक आंदोलनानंतर अखेर सरकारचा मोठा निर्णय; कामगारांना ३ हजारांची पगारवाढ
15
वैभवला शून्यावर बाद करण्याच्या १०० दिवस आधी, प्रफुल अन् पांड्या यांच्यात 'असं'च काही घडलं होतं
16
Mutual Fund मध्ये भरभरुन पैसे ओतताहेत लोक; ₹७० लाख कोटींच्या पार पोहोचलं AUM
17
Praful Hinge: प्रफुल हिंगेच्या यशाचं गुपित कळलं! वडील म्हणाले, "त्या दोन दिग्गज क्रिकेटपटूंनी माझ्या मुलाला घडवलं"
18
"शेवटचं बोलणंही होऊ शकलं नाही..."; जवळच्या मैत्रिणीच्या निधनानंतर गहिवरल्या मुमताज
19
३ व्रतांचा महासंयोग: प्रदोष-शिवरात्रि, स्वामी स्मरण दिन एकाच दिवशी; ३ उपाय करा, पुण्य मिळवा!
20
डोळ्यात मिरचीची पूड फेकली अन् ५ सेकंदात कोयत्याने केले सपासप वार; महिलेने युवकावर का केला हल्ला?
Daily Top 2Weekly Top 5

पाटोदा तालुक्यात यंदा सोयाबीन, तुरीचे क्षेत्र वाढणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 26, 2021 04:33 IST

कापूस, बाजरीचे क्षेत्र घटणार पाटोदा : अत्यल्प सिंचन क्षेत्र व डोंगराळ भूभाग असलेल्या पाटोदा तालुक्यात यंदा चांगल्या पावसाची ...

कापूस, बाजरीचे क्षेत्र घटणार

पाटोदा : अत्यल्प सिंचन क्षेत्र व डोंगराळ भूभाग असलेल्या पाटोदा तालुक्यात यंदा चांगल्या पावसाची शक्यता असल्याने खरिपाची पेरणी ५८ हजार हेक्टरपेक्षा जास्त होण्याची शक्यता असून, यंदा खरीप हंगामात सोयाबीन व तुरीच्या पेरणी क्षेत्रात वाढ होणार असल्याचा कृषी विभागाचा अंदाज आहे.

बीड जिल्ह्यात पाटोदा तालुका हा दुष्काळी तालुका म्हणून ओळखला जातो. ८१ हजार हेक्टर भौगोलिक क्षेत्र असलेल्या पाटोदा तालुक्यात खरीप हंगामात ५८ हजार हेक्टर क्षेत्रावर पेरणी होते. गेल्या खरीप हंगामात झालेला समाधानकारक पाऊस व यंदाही हवामान खात्याने चांगला पाऊस होण्याची वर्तविलेल्या शक्यता लक्षात घेता यंदा खरिपाच्या क्षेत्रात वाढ होण्याचा अंदाज आहे.

अत्यल्प सिंचन क्षेत्र असलेल्या पाटोदा तालुक्यात खरीप हंगामात बाजरी हे महत्त्वाचे पीक होते; मात्र तालुक्यात सिंचन तलाव, पाझर तलाव व साठवण तलावांची संख्या गेल्या १०-१५ वर्षांत वाढल्याने बाजरीची जागा सोयाबीन या नगदी पिकाने घेतली आहे. गेल्या खरीप हंगामात तालुक्यात २८ हजार हेक्टरवर सोयाबीनची पेरणी झाली होती. यंदा सोयाबीनच्या क्षेत्रात दोन ते तीन हजार हेक्टर वाढ होणार आहे.

खरीप हंगामात तालुक्यात सोयाबीन, कापूस, तूर, बाजरी, मूग व उडीद या पिकांची पेरणी केली जाते. यंदा कापूस या पिकाचे क्षेत्र कमी होऊन सोयाबीन व तुरीचे क्षेत्र वाढण्याचा कृषी विभागाचा अंदाज आहे.

गेल्यावर्षी तालुक्यात समाधानकारक पाऊस झाल्याने पिकाची परिस्थिती समाधानकारक राहिली. त्यामुळे तलावातील पाणीसाठे चांगले राहिल्याने पाणीटंचाईचा प्रश्न निर्माण झाला नाही. यंदा पावसाचे पाणी या तलावात येईपर्यंत सध्याचे पाणी पिण्यासाठी पुरणार आहे.

गेल्यावर्षी प्रमाणेच यंदाही चांगल्या पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तविलेली आहे. शेतकऱ्यांनी सोयाबीनचे बियाणे घरातील वापरावे ; मात्र या बियाणांची उगवण क्षमतेची चाचणी करावी. बियाणे पेरणीपूर्वी बीजप्रक्रिया करूनच पेरणी करावी.

- गांगुर्डे,

तालुका कृषी अधिकारी पाटोदा.