दिवट्या मुलाचा प्रताप; मृत वडिलांची बनावट सही करून ६५ लाखांवर डल्ला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 11, 2021 14:40 IST2021-09-11T14:38:46+5:302021-09-11T14:40:01+5:30

crime in Beed : धनादेशावर बनावट सह्या करून महाराष्ट्र बँकेतील ६५ लाख ९२ हजार रुपये स्वत:च्या खात्यात जमा केले.

Son 65 lakh transferred in own account by forged signature of dead father | दिवट्या मुलाचा प्रताप; मृत वडिलांची बनावट सही करून ६५ लाखांवर डल्ला

दिवट्या मुलाचा प्रताप; मृत वडिलांची बनावट सही करून ६५ लाखांवर डल्ला

ठळक मुद्देआईच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल

बीड : वडील मृत झाल्यानंतर त्यांच्या खात्यातील ६५ लाखांवर मुलाने आईच्या परस्पर डल्ला मारला. त्यासाठी त्याने धनादेशावर वडिलांची चक्क बनावट स्वाक्षरी केली. शहरातील मलिकपुरा भागात हा धक्कादायक प्रकार उजेडात आला. त्यानंतर आईने दिवट्या मुलाविरुद्ध शहर ठाण्यात ९ सप्टेंबर रोजी गुन्हा नोंद केला.

कमर बेगम अब्दुल रौफ (६०, रा. मलिकपुरा) यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, मुलगा अब्दुल रहीम अब्दुल रौफ (३७) याने वडील मृत असताना त्यांच्या धनादेशावर बनावट सह्या करून महाराष्ट्र बँकेतील ६५ लाख ९२ हजार रुपये स्वत:च्या खात्यात जमा केले. ७ सप्टेंबर रोजी ही बाब उजेडात आली. यावर विचारणा केली असता, त्याने आईला शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिली. याप्रकरणी अब्दुल रहीम अब्दुल रौफ याच्याविरुद्ध शहर ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला. तपास पोलीस निरीक्षक हेमंत कदम करीत आहेत.

हेही वाचा - वेळीच सावध व्हा ! भाडेकरूने घरमालकाच्या नावावर काढले साडेचार लाखांचे कर्ज

Web Title: Son 65 lakh transferred in own account by forged signature of dead father