‘आष्टीतील काही नेते सरड्याप्रमाणे रंग बदलून कोलांटउड्या मारणारे..’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 19, 2018 23:47 IST2018-09-19T23:47:07+5:302018-09-19T23:47:39+5:30
आष्टीतील काही नेत्यांना सरड्याप्रमाणे रंग बदलण्याची सवय जडली आहे. स्वत:च्या स्वार्थासाठी कधी या पक्षात तर कधी दुसऱ्या पक्षात कोलांटउड्या मारणारे आहेत. भविष्यात आपल्याला राजकारणात वरचढ होणाºया कार्यकर्त्यांवर येथे खोटे गुन्हे दाखल केले जातात. आष्टीला तालीम पाडली तरी पण येणाºया निवडणुकीत आमचाच पहिलवान विजयी होणार असल्याचे विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडे यांनी बुधवारी कडा येथे आयोजित कार्यकर्ता मेळाव्यात सांगितले.

‘आष्टीतील काही नेते सरड्याप्रमाणे रंग बदलून कोलांटउड्या मारणारे..’
लोकमत न्यूज नेटवर्क
आष्टी : आष्टीतील काही नेत्यांना सरड्याप्रमाणे रंग बदलण्याची सवय जडली आहे. स्वत:च्या स्वार्थासाठी कधी या पक्षात तर कधी दुसऱ्या पक्षात कोलांटउड्या मारणारे आहेत. भविष्यात आपल्याला राजकारणात वरचढ होणाºया कार्यकर्त्यांवर येथे खोटे गुन्हे दाखल केले जातात. आष्टीला तालीम पाडली तरी पण येणाºया निवडणुकीत आमचाच पहिलवान विजयी होणार असल्याचे विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडे यांनी बुधवारी कडा येथे आयोजित कार्यकर्ता मेळाव्यात सांगितले.
माजी मंत्री आ. सुरेश धस यांचे नाव न घेता त्यांनी आपल्या भाषणात त्यांच्यावर जोरदार टीका केली. जेव्हा जेव्हा शेतकरी अडचणीत सापडला तेव्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष त्यांच्या खंबीरपणे पाठीशी उभा राहिला, केंद्र व राज्य सरकारने अच्छे दिनचे गाजर दाखवून शेतकरी व सर्वसामान्य जनतेचा विश्वासघात केला. आष्टीत दोन आमदार असून देखील त्यांनी मतदार संघ भकास केला आहे. त्यातील नवीन झालेल्या आमदाराने आष्टीची चिंता करण्याऐवजी त्यांना परळीचीच चिंता जास्त असल्याचा टोला लगावला.
या मेळाव्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बजरंग सोनवणे , प्रकाश सोळंके, अमरसिंह पंडित, बापूसाहेब डोके, बाळासाहेब आजबे, तालुकाध्यक्ष आण्णासाहेब चौधरी, डॉ. शिवाजी राऊत, सतीश शिंदे, सय्यद अब्दुलभाई, पोपट गर्जे, गोपाळ धांडे, नामदेव शेळके, शिवाजी डोके, शिवाजी नाकाडे, किशोर हंबर्डे, पांडुरंग चौधरी, दादासाहेब गव्हाणे, काकासाहेब शिंदे, प्रा.बाळासाहेब पवार यांच्यासह तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. मेळाव्याची जय्यत तयारी केली होती.
विधानसभेची तयारी
गेल्या काही दिवसांपासून माजी मंत्री आ. सुरेश धस आणि विधान परिषद विरोधी पक्ष नेते मुंडे यांच्यात जुगलबंदी चालू आहे.
या पार्श्वभूमीवर हा कार्यकर्ता मेळावा होत असल्यामुळे धनंजय मुंडे आणि इतर मान्यवर काय बोलतात, याकडे जिल्ह्याची उत्सुकता लागली होती.
‘तालीम’ प्रकरणानंतर भाजपाचे पदाधिकारी सतीश शिंदे हे आजही या मेळाव्याच्या व्यासपीठावर होते.