जिल्हा परिषद शाळेच्या शिक्षकाने बनविले स्मार्ट हँडवाॅश स्टेशन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 28, 2021 05:03 IST2021-02-28T05:03:56+5:302021-02-28T05:03:56+5:30
बीड : तालुक्यातील कुर्ला येथील जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळेतील प्रयोगशील विज्ञान शिक्षक भाऊसाहेब संभाजी राणे यांनी विनासंपर्क विद्यार्थ्यांना ...

जिल्हा परिषद शाळेच्या शिक्षकाने बनविले स्मार्ट हँडवाॅश स्टेशन
बीड : तालुक्यातील कुर्ला येथील जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळेतील प्रयोगशील विज्ञान शिक्षक भाऊसाहेब संभाजी राणे यांनी विनासंपर्क विद्यार्थ्यांना लिक्विड सोप देणारे आणि त्यानंतर स्वच्छ पाणी संपर्कविना मिळणारे आधुनिक पद्धतीचे स्मार्ट स्टेशन तयार केले आहे. याचा विद्यार्थ्यांना शाळेत चांगला फायदा होत आहे. शाळांमध्ये विद्यार्थ्यांना वर्गात प्रवेश करण्यापूर्वी लिक्विड सोप अथवा साबणाच्या पाण्याने वारंवार हात स्वच्छ करण्यासाठी हँडवॉश स्टेशन आवश्यक बनले आहे. आहे. मात्र अल्कोहलयुक्त सॅनिटायझर वापरणे धोक्याचे आहे त्याच्यावर रामबाण उपाय म्हणजे वारंवार साबणाने हात धुणे योग्य असल्याने हे हँडवॉश स्टेशन इतर शाळांतही उपयुक्त ठरणार आहे. याबद्दल गावचे सरपंच अनिल पाटील, मनोज गुंड, संदीप पाटील, तुषार पाटील, शिक्षणाधिकारी (प्रा.) श्रीकांत कुलकर्णी, उपशिक्षणाधिकारी मोहन काकडे,मुख्याध्यापक परवीन सिद्दिकी, केंद्रप्रमुख राजश्री लोहार, विस्ताराधिकारी सिद्धेश्वर माटे, गटशिक्षणाधिकारी तुकाराम जाधव यांनी स्वागत केले आहे.
हँडवॉश स्टेशनसाठी साहित्य
बारा व्होल्ट बॅटरी, पाच व्होल्ट रिले, वायर, पाण्याच्या तोट्या, प्लॅस्टिक ड्रम, लोखंडी स्टॅन्ड, थर्मल सेन्सर, रिचार्जेबल सेन्सर, सायरन, डिजिटल टायमर आदी.
खर्च अवघे पाच हजार रूपये
आय. आर. सेन्सरचा वापर करून विनासंपर्क सोप वॉटर आणि स्वच्छ पाणी विद्यार्थ्यांच्या हातावर पडते. त्यामुळे पाण्याच्या तोटीशी विद्यार्थ्यांच्या हाताचा संपर्क येत नाही. साबणाच्या पाण्यासाठी १०० लिटर आणि स्वच्छ पाण्यासाठी ५०० लिटरचा प्लॅस्टिक ड्रम वापरण्यात आला आहे. २० ते एक हजारापर्यंत विद्यार्थीसंख्या असणाऱ्या शाळेसाठी अत्यंत उपयुक्त स्मार्ट स्टेशन आहे. विद्यार्थ्यांना हात धुण्याची आठवण करून देण्यासाठी यात आलारामची सोय केली आहे. या स्मार्ट हँडवॉश स्टेशनमध्ये विद्यार्थ्यांचे तापमान विनासंपर्क मोजण्याची सोयदेखील आहे. अवघ्या पाच हजार रुपयांमध्ये स्मार्ट स्टेशन तयार करण्यात आले आहे.
भाऊसाहेब राणे यांचे अनेक प्रयोग राज्य आणि राष्ट्रीय स्तरावर गाजलेले आहेत. अपघात विरोधी चुंबकीय प्रणाली,पिकांची राखण करणारा यंत्रमानव, शाळेच्या विजेच्या बाबतीत स्वयंपूर्ण करणारे सोलारविंड हायब्रीड युनिट, खडूच्या सूक्ष्म कणांपासून शिक्षकांचे संरक्षण करणारा हायटेक डस्टर, गाडीचे मायलेज दुप्पट करणारी प्रणाली, ऑटोमॅटिक सोप वॉटर डिस्पेंसरची निर्मिती आदी प्रयोगाच्या माध्यमातून राणे यांनी ग्रामीण विद्यार्थ्यांना राष्ट्रीय पातळीवर घेऊन जाण्याचे काम केले आहे. उत्कृष्ट शैक्षणिक साहित्य निर्मितीबाबत महाराष्ट्र शासनाचा प्रथम पुरस्कारही राणे यांना मिळालेला आहे.
===Photopath===
270221\272_bed_19_27022021_14.jpg~270221\272_bed_18_27022021_14.jpg
===Caption===
handwash studant1~handwash studant