सिद्धेश्वर शैक्षणिक संकुल हे गुणवत्ता, सामाजिक उपक्रमात कायम अग्रेसर : चंद्रकांत मुळे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 17, 2021 04:33 IST2021-03-17T04:33:52+5:302021-03-17T04:33:52+5:30
श्री सिद्धेश्वर महाविद्यालय आणि आय.डी.एफ.सी. फर्स्ट भारत बँक यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित डिजिटल बोर्ड उद्घाटन आणि शिष्यवृत्ती ...

सिद्धेश्वर शैक्षणिक संकुल हे गुणवत्ता, सामाजिक उपक्रमात कायम अग्रेसर : चंद्रकांत मुळे
श्री सिद्धेश्वर महाविद्यालय आणि आय.डी.एफ.सी. फर्स्ट भारत बँक यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित डिजिटल बोर्ड उद्घाटन आणि शिष्यवृत्ती वितरण सोहळ्याप्रसंगी प्रमुख उदघाटक म्हणून ते बोलत होते.
या प्रसंगी व्यासपीठावर बँकेचे जनरल मॅनेजर (तामिळनाडू) जॉन पॉल अशोक, सहाय्यक मॅनेजर (महाराष्ट्र) शरद देडे, संकुलाचे अध्यक्ष प्रकाश दुगड, कार्यवाह अमरनाथ खुर्पे , महाविद्यालय विकास समितीचे अध्यक्ष अभय कोकड ,केंद्रीय सदस्य तथा मुख्याध्यापक बाबूराव आडे, स्थानिक बँक मॅनेजर संदीप पवार, अमोल तुळसे यांची प्रमुख उपस्थिती होती.
कार्यक्रमाच्या प्रारंभी देवी सरस्वती आणि स्व.दत्तोपंतजी ठेंगडी यांच्या प्रतिमेचे पूजन मान्यवरांच्या हस्ते झाले. प्रा.अंकुश साबळे यांनी पद्य सादर केले.
महाविद्यालयातील स्नेहा गायकवाड, छाया चाटे, सुनीता ढगे या होतकरू विद्यार्थिनींना बँकेच्या वतीने शिष्यवृत्ती प्रदान करण्यात आली. त्यानंतर उपप्राचार्य डॉ.गजानन होन्ना यांनी मार्गदर्शन केले. प्रमुख पाहुणे जनरल मॅनेजर जॉन पॉल अशोक यांनी ३३ वर्षांपासून बँक करत असलेल्या सामाजिक उपक्रमानुसार आम्ही दिलेल्या डिजिटल बोर्डाचा विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा, हे सांगितले. याप्रसंगी शरद देडे आणि संदीप पवार यांचीही समयोचित भाषणे झाली.
अध्यक्षीय समारोपात प्रकाश दुगड म्हणाले की, आयडीएफसी बँक राबवत असलेले सामाजिक उपक्रम अतिशय उत्कृष्ट आहेत. शिक्षणासोबतच आज तरुणांना सामाजिक भान व मूल्य शिक्षण जपण्याचे धडे देणे आवश्यक झाले आहे असे त्यांनी म्हटले. प्रास्ताविक आणि परिचय गुणवत्ता हमी कक्ष प्रमुख डॉ. विनायक देशमुख यांनी केले . तसेच सूत्रसंचालन डॉ. विकास बोरगावकर यांनी, आभार समीर मुळी यांनी मानले. या कार्यक्रमाचे संयोजन उपप्राचार्य युवराज मुळ्ये, डॉ.गजानन होन्ना ,संतोष लिंबकर आणि डॉ. विनायक देशमुख यांनी केले.
===Photopath===
160321\purusttam karva_img-20210316-wa0036_14.jpg
===Caption===
माजलगाव येथे श्री सिद्धेश्वर महाविद्यालय आणि आय.डी.एफ.सी. फर्स्ट भारत बँक यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित डिजिटल बोर्ड उद्घाटन आणि शिष्यवृत्ती वितरण सोहळ्याप्रसंगी प्रमुख उदघाटक म्हणून बोलताना प्रा.चंद्रकांत मुळे