सादोळ्यात चाकुचा धाक दाखवत दोन ठिकाणी चोरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 4, 2018 19:24 IST2018-12-04T19:23:34+5:302018-12-04T19:24:09+5:30
तालुक्यातील सादोळा येथे दोन ठिकाणी चाकुचा धाक दाखवत चोरी केल्याची घटना मंगळवारी पहाटे घडली.

सादोळ्यात चाकुचा धाक दाखवत दोन ठिकाणी चोरी
माजलगाव (बीड ) : तालुक्यातील सादोळा येथे दोन ठिकाणी चाकुचा धाक दाखवत चोरी केल्याची घटना मंगळवारी पहाटे घडली. याप्रकरणी माजलगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सादोळा येथील गौतम शिवाजी सोळंके यांच्या घरी रात्री आलेल्या चोरट्यांनी त्यांच्या घरापाठीमागे झोपलेल्या आजीला चाकुचा धाक दाखवत गळ्यातील सोन्याचे मनी ,कानातील फुल काढुन घेतले व त्यानंतर चोरट्यांनी आपला मोर्चा श्रीकांत माहादेवराव सोळंके यांच्या घराकडे वळवला. येथे घरातील रोख रक्कम लंपास केली. या दोन्ही घटनांमध्ये जवळपास २८ हजार ८०० रूपयांचा ऐवज लंपास केला आहे. या प्रकरणाची माजलगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात नोंद झाली आहे. तपास पोलीस उपनिरीक्षक संतोष मरळ हे करीत आहेत.