धक्कादायक ! परळीत खदानीतील पाण्यात बुडून तीन भावंडांचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 8, 2020 10:17 IST2020-06-08T10:16:44+5:302020-06-08T10:17:22+5:30

खदानीजवळ दगडफोड करणाऱ्या मजूर कुटुंबातील मुले

Shocking! Three siblings drown in Parli mine | धक्कादायक ! परळीत खदानीतील पाण्यात बुडून तीन भावंडांचा मृत्यू

धक्कादायक ! परळीत खदानीतील पाण्यात बुडून तीन भावंडांचा मृत्यू

परळी : तालुक्यातील दाऊतपूरजवळील खदानीतील डोहात कपडे धुण्यासाठी गेलेल्या दोन सख्ख्या बहिणींचा व एका चुलत भावाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना सोमवारी सकाळी ७ वाजेच्या सुमारास घडली. खदानीजवळच असलेल्या खडी केंद्र परिसरात दगड फोडण्याचे काम करणाऱ्या दांडेकर कुटुंबावर यामुळे दुःखाचा डोंगर कोसळला आहे. 

दादाहरी वडगाव शिवारात राहणाऱ्या सुरेखा राजू दांडेकर( १३) व रेखा राजू दांडेकर ( १५ ) या दोन बहिणी खदानीतील पाण्यात कपडे धुण्यासाठी सकाळी आल्या होत्या. यावेळी चुलत भाऊ रवि नारायण दांडेकर ( ११ ) हा सुद्धा त्यांच्यासोबत होता. कपडे धूत असताना रवी हा पाण्यात बुडाला, त्याला वाचवण्यासाठी एक बहीण प्रयत्न करीत असताना ती पण बुडाली. दोघांना वाचण्यासाठी दुसरी बहीण डोहात उतरली मात्र पोहता येत नसल्याने तिघेही पाण्यात बुडाली. घटनेची माहिती मिळताच नातेवाईकांनी तातडीने येऊन  पाण्यातून तिघांना बाहेर काढले. तिन्ही भावंडांचे मृतदेह पाहून नातेवाईकांनी एकच आक्रोश केला. परळी ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक काळे, सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रीकांत जाधवर, जमादार राहुल दाहिजे, व्यंकट डोनाळे घटनास्थळी येऊन पंचनामा केला. 

Web Title: Shocking! Three siblings drown in Parli mine