धक्कादायक! अश्लील व्हिडीओ दाखवून शाळेत विद्यार्थिनींचा लैंगिक छळ, मुख्याध्यापकाला अटक

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 12, 2017 13:36 IST2017-12-12T13:30:45+5:302017-12-12T13:36:12+5:30

शाळेतील मुख्याध्यापकाने विद्यार्थिनीचा लैंगिक छळ केल्याची धक्कादायक घटना बीडमध्ये घडली आहे.

Shocking! Sexual harassment of girl students in the school | धक्कादायक! अश्लील व्हिडीओ दाखवून शाळेत विद्यार्थिनींचा लैंगिक छळ, मुख्याध्यापकाला अटक

धक्कादायक! अश्लील व्हिडीओ दाखवून शाळेत विद्यार्थिनींचा लैंगिक छळ, मुख्याध्यापकाला अटक

ठळक मुद्देशाळेतील मुख्याध्यापकाने विद्यार्थिनीचा लैंगिक छळ केल्याची धक्कादायक घटना बीडमध्ये घडली आहे. शिक्षकी पेशाला काळीमा फासणारी ही घटना बीड जिल्ह्यातील ढोरवाडीमधील जिल्हा परिषद शाळेत घडली आहे.

बीड- शाळेतील मुख्याध्यापकाने विद्यार्थिनीचा लैंगिक छळ केल्याची धक्कादायक घटना बीडमध्ये घडली आहे. शिक्षकी पेशाला काळीमा फासणारी ही घटना बीड जिल्ह्यातील ढोरवाडीमधील जिल्हा परिषद शाळेत घडली आहे. पालकांच्या तक्रारीनंतर मुख्याध्यापक दिगंबर शिंदे याला वडवणी पोलिसांनी अटक केलं आहे. एबीपी माझा या वृत्तवाहिनीने हे वृत्त दिलं आहे. 

मुख्याध्यापक दिगंबर शिंदे हा दुपारच्या वेळेत काही मुलींना वर्गातच थांबवून ठेवायचा. त्यानंतर त्यांना मोबाइलवर अश्लील व्हिडीओ दाखवून त्यांचा लैंगिक छळ करायचा. पण, हा सर्व प्रकार असह्य झाल्यानं एका विद्यार्थिनीने घडलेली घटना आपल्या पालकांना सांगितली. मुलीने पालकांना घडलेल्या प्रकाराची माहिती दिल्यानंतर मुख्याध्यापकाचं कृत्य बाहेर आल्याची माहिती समोर आली आहे. 

शाळेचा मुख्याध्यापक दिगंबर शिंदे हा गेल्या अनेक महिन्यांपासून अल्पवयीन मुलींचा लैंगिक छळ करत असल्याचं उघड झालं आहे. दुपारच्या जेवणाच्या सुट्टीत तो काही मुलींना वर्गात बोलावून घ्यायचा आणि त्यांना मोबाइलमध्ये अश्लील व्हिडीओ दाखवून त्यांचा लैंगिक छळ करायचा. तसंच या सर्व प्रकाराबद्दल कुणालाही न सांगण्याची धमकी तो मुलींना देत असल्याचं चौकशीत समोर आलं आहे. 

या सर्व प्रकाराची माहिती मिळताच संबंधित मुलींच्या पालकांनी वडवणी पोलीस ठाण्यात धाव घेत मुख्याध्यापकाविरोधात तक्रार दिली. या प्रकरणी पोलिसांनी तात्काळ कारवाई करत आरोपी दिंगबर शिंदेला अटक केली. अल्पवयीन मुलींचा लैंगिक छळ करणाऱ्या मुख्याध्यापकाला कायमची अद्दल घडविण्याची मागणी पालक आणि ग्रामस्थांकडून होत आहे.

Web Title: Shocking! Sexual harassment of girl students in the school

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.